कविता
विचार
'Cogito ergo sum' अर्थात 'माझं अस्तित्व माझ्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे' हे रेने देकार्त ह्या थोर फ्रेंच तत्ववेत्त्याचं विधान पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा पाया मानलं जातं. आणि विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरता कवितेएवढं दुसरं प्रभावी साधन नसेल. त्यामुळे माझ्या काही कविता माझ्या विचारांवर आधारित आहेत.
जानेवारी ९, २०१९
जानेवारी ९, २०१९
अनिवासी भारतीय बांधवांची आठवण ठेवून आज ‘प्रवासी भारतीय दिवस’ साजरा केला जातो. अनिवासी भारतीयांत मराठी मंडळी बरीच आहेत. आणि अनिवासी भारतीयांचा प्रवास म्हटलं की विमानप्रवासही आलाच. तर अशाच एका विमान कंपनीने एका मराठी कवीला अध्यक्षपदावर नेमलं. मग काय! नवीन राजाच्या राज्यात विमानातील उद्घोषणाही मराठी कवितेतून करण्याची टूम निघाली... विमान आपुले तयार आहे करण्याला उड्डाण दीड तासभर समय संपता येई गंतव्य स्थान मेज समोरील बंद करावे बांधा ह्याची गाठ पाठ आसनाचीही करावी लगेच तुम्ही ताठ वरच्या कप्प्यामध्येच ठेवा जिन्नस तुमचे सारे पट्टा आवळूनी घट्ट आसनी नंतर शांत बसा रे तुमच्या खिडकीवरील आवरण आता खुलेच ठेवा फोन आणखी संगणकाला थोडा आराम द्यावा धुम्रपान मद्यपानबंदीस कायद्याचा आधार नमस्कार हो प्रवासी बांधव सप्रेम नमस्कार ॥ विमानात तुम्ही आमुच्या येता हर्ष होई अपार नमस्कार हो प्रवासी बांधव सप्रेम नमस्कार ॥ धृ ॥
आवडले?4
मे १९, २०१७
मे १९, २०१७
माणूस हा समुदायात राहणारा प्राणी आहे. समुदायात प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या भावना, स्वतःच्या श्रद्धा, स्वतःची विचार करण्याची पद्धत असते. अशा विभिन्न व्यक्ती आणि व्यक्तिमत्वांमुळेच समाज बनतो. कधी कधी मुद्दाम भडकवलेल्या भावनांच्या भरात आपण समुदायाचा हा नियम विसरून जातो ... आपल्याला एक धोका आहे आपला देश धोक्यात आहे आपल्या देशाचा आपल्याला अभिमान, नाही ... गर्व, नाही ... माज हवा आपण एक काम करूया आपल्या देशाला आपण वाचवूया बाकी सारे देश बेचिराख करून ...
आवडले?43
जून १७, २०१६
जून १७, २०१६
माकडापासून मानव उत्क्रांत होताना शेपटी हा शरीराचा एक अवयव गेला पण व्यसन हा मनाचा एक अवयव मात्र चिकटला. बढाईखोरांचं "मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही." इथपासून "मी WhatsApp दिवसातून फक्त तीनदाच check करतो." इथपर्यंत स्थित्यंतर आपण बघितलं आहे. सर्व व्यसनांपासून मुक्ती ही एक अद्भुतरम्य कल्पना आहे. व्यसनामुळे आपल्याला आनंद मिळत असताना दुसऱ्यांना त्रास होऊ नये एवढी काळजी मात्र नक्कीच घेता येईल... व्यसन नावाच्या सापळ्याचे असतात खूप प्रकार बाहेरख्यालीपणापासून सिगरेट दारू जुगार व्यसन कॉम्प्युटरचं असलं तहान नाही भूक माणसं झाली बेटं कारण नाती झाली मूक
आवडले?10
जून ३, २०१६
जून ३, २०१६
सध्या प्रसारमाध्यमांचं युग सुरु आहे. टीवी, व्हॉट्सॲप, फेसबुक वगैरे माध्यमांवर अनेक प्रश्नांबाबत तावातावाने चर्चा चाललेली असते. प्रत्येकाकडे प्रत्येक प्रश्नाचं काही ना काही उत्तर असतं. आणि तरीही काही प्रश्न सोपी उत्तरं न दिल्याने कठीण होऊन बसलेले आहेत. मला पडलेले असेच काही 'कठीण' प्रश्न... माझ्या मनात काही प्रश्न आहेत मोठे रास्त उत्तर ज्यांचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त विडी सिगारेट आरोग्याला अपायकारक फार कानीकपाळी ओरडून सांगे आपल्याला सरकार तंबाखूचा उद्यम कैसा चाले मग निर्धास्त उत्तर ज्यांचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त
आवडले?69
मार्च ४, २०१६
मार्च ४, २०१६
आपल्या देशभक्तीच्या संकल्पना अगदी ठसठशीत आहेत. देशदर्शक कोणत्याही प्रतीकाला जराही धक्का लागला तर आपण ते खपवून घेत नाही. मात्र देशप्रेमाची भावना कायदे आणि नियम पाळण्याच्या लहान लहान कृतीमधून जास्त दृगोच्चर होऊ शकते हे आपण 'सोयीस्कर'पणे विसरत तर नाही ना? त्या देशद्रोह्यांविरुद्ध सात्त्विक संताप अनावर झाला व्यक्त करण्याकरता जो तो सामाजिक माध्यमांवर आला प्रत्येकाची देशप्रेमाची व्याख्या होती सुस्पष्ट आणि नीट देशप्रेम म्हणजे झेंडा देशप्रेम म्हणजे राष्ट्रगीत देशभक्तीची परिमाणे बदलून कशी चालतील उगीच सर्वांना कायदे आणि नियम पाळावे लागतील
आवडले?39
जानेवारी १५, २०१६
जानेवारी १५, २०१६
घरचे आणि ऑफिसचे ताण-तणाव, गरिबी, महागाई, देशातील सद्यस्थिती, मुलभूत सुविधांसाठी करावी लागणारी धडपड, स्पर्धा अशा अनेक समस्यांना तोंड देणारे आपण वेडे होऊन आत्महत्या करत नाही ह्याला एक कारण आहे. आपल्या प्रत्येकाकडे एक तरी अफूची गोळी असते. कठीण प्रसंगी नशा करावी असते समजूत भोळी प्रत्येकाची अशा प्रसंगी असे अफूची गोळी नवे वर्ष हे आपुल्याकरता आहे फार कठीण येतील आव्हाने तुमच्या सामोरी नवीन नवीन कर्मचारी आपुले पण साऱ्या देशी सर्वोत्तम सांगावे किती काम तयांना येतच नाही शीण हरेक मॅनेजर सांगे दर वर्षी अशाच ओळी काम कर्मचाऱ्यांकरता ती असे अफूची गोळी
आवडले?91