डाॅक्टर मला विचारत होते झालंय तरी काय
कसलं एवढं टेन्शन घेता बी पी झालंय हाय || धॄ ||
काय सांगू त्या दिवशी मी घरी होतो जात
सिग्नलपाशी सुंदर युवती दाखवत होती हात
सोडाल का हो घरी माझ्या उशीर झालाय खूप
प्रश्न ऐकला गाडीमध्ये घेतलं तिजला आत
बोलती बंद झाली माझी मी तर भलताच शाय
देखणं रूप पाहून माझं बी पी झालं हाय || १ ||
काय बोेलू ते समजत नव्हतं माझ्यावर मी कृद्ध
विचार करत होतो एवढ्यात तीच बोलली खुद्द
चक्कर येतेय मला आणखी होर्इल वाटे उलटी
एवढं बोलून माझ्याशी ती झाली की बेशुद्ध
घेऊन गेलो हाॅस्पिटलला होता तोच उपाय
पाहून तिची अवस्था माझं बी पी झालं हाय || २ ||
अभिनंदन ही बनेल आर्इ तीस आठवडे थांबा
ऐकूनी डाॅक्टरचे हे म्हणणे सुटला माझा ताबा
गोंधळलेला मी असताना शुद्धीवर ती आली
दावूनी अंगुली मला म्हणाली तुम्ही मुलाचे बाबा
डाॅक्टर सारे बघती माझे लटपटती अन् पाय
चेहेरे पाहून त्यांचे माझं बी पी झालं हाय || ३ ||