logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
डोरेमॉन
जानेवारी 4, 2013
मन
एप्रिल 5, 2013
परकी मावशी
फेब्रुवारी 15, 2013
दर वर्षी येणारा फेब्रुवारी २१ हा दिवस राष्ट्रकुल संघाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला आहे. हा दिवस जरी पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानातील (सध्याच्या बांग्लादेशातील) बंगाली भाषिकांच्या लढ्याशी संबंधित असला तरी भारतासारख्या देशात जिथे इंग्रजी नावाच्या परक्या मावशीने आपल्या मराठी मातेची गळचेपी चालवली आहे, तिथे विशेष महत्वाचा आहे. आपल्या घरात ठाण मांडून बसलेल्या ह्या परक्या मावशीला मारलेली ही एक कोपरखळी …

टेबलावरती ठेवली होती बाटली थंडगार
मास्तरांनी घेतले पाणी घोट दोन चार
शर्ट पॅन्टचे खिसे अचानक तपासून ते बघती
पाकीट विसरून आले होते विसरभोळे फार

स्वच्छ मराठी प्रसंग सारा निरखून पाहाल तर
इंग्रजीचे शब्द तुम्हाला दिसतील मग भरभर
टेबल बाटली मास्तर शर्ट पॅन्ट आणि पाकीट
भाषेमध्ये आपल्या चपखल करून बसले घर

कळत नकळत केव्हा आली समजत नाही कैशी
आपल्या घरात ठाण मांडुनी बसली परकी मावशी || १ ||

स्वातंत्य्राच्या पूर्वी जेव्हा राज्य होतं परकं
इथल्या आपल्या भाषांचंही स्थान होतं हलकं
स्वतंत्र झाला भारत तरीही मायबोलीकडे
सरकार दरबारीही अजून पाहिलं जातं तिरकं

माध्यम घेतलं इंग्रजी तर कच्चा राही पाया
शिक्षण घेतलं मराठीमध्ये सारंच जार्इ वाया
साधे साधे शब्द मराठी कळत आता नाहीत
डॅडी झाले बाबा आणि मम्मी झाल्या आया

आपली भाषा विसरून जाती पडले सारे फशी
आपल्या घरात ठाण मांडुनी बसली परकी मावशी || २ ||

आधीच आपल्या घरात आहेत आपल्या कित्येक मावशा
देशामध्ये आहेत जितके प्रांत तितक्या भाषा
मातॄभाषा राष्ट्रभाषा कमी आहेत म्हणून
लागे आत्मसात करावी आणखीन परकी भाषा

मान्य आहे भाषा असतं संवादाचं साधन
भेसळ त्यात झाली तरीही कळतं तुमचं भाषण
ह्मा न्यायाने पोळी भाजी हवी कशाला रोज
पोट भरेल रोज भेळ शेवपुरीचं जेवण

दिवसेंदिवस होत आहे इंग्रजीची सरशी
आपल्या घरात ठाण मांडुनी बसली परकी मावशी || ३ ||

फायदा झाला आहे आपला ह्मात नाही वाद
आपल्या इंग्रजीला मिळते परदेशीही दाद
इंग्रजीच पण बनली आहे विद्येचे परिमाण
आपलीच भाषा विसरून जायचा घडतो पाहा प्रमाद

नवीन कुठली भाषा शिकणं काहीच नाही गैर
प्रेम मराठीवरी म्हणजे दुसऱ्यांशी ना वैर
साऱ्या भाषा समर्थ असती आपल्या आपल्या जागी
पण इंग्रजीचा वापर आवरा झाला आहे स्वैर

बाकी देशांत परकी भाषा शिकतो मनुष्य हौशी
आपल्या घरात ठाण मांडुनी बसली परकी मावशी || ४ ||

परक्या मावशीस आपणही पण थोडंसं फसवलं
झगा लावला बदलायला अन् पातळच नेसवलं
जंगल बाजार लूट गुरू देऊन ऐसे शब्द
देशी अलंकार घालुनी तिजला छान सजवलं

नक्की कुठली भाषा आपुली इंग्रज आता फसेल
थडग्यामध्ये आपल्या शेक्सपिअर रडत असेल
भविष्यकाळी देशी इंग्रजी जगभर बोलली जार्इल
मुळ इंग्रजी कोणती पत्ता कोणालाच नसेल

परकी मावशी घरची झाली आर्इ कशी विसरशी
आपल्या घरात ठाण मांडुनी बसली परकी मावशी || ५ ||

शेअर करा
3

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं


पुढे वाचा...
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • तुळस जून 5, 2023
  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो