logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
सल
डिसेंबर 12, 2019
स्त्री
मार्च 8, 2020
प्रेमाचा पाढा
फेब्रुवारी 14, 2020
आज प्रेमाचा उत्सव! प्रेमात पडलं की जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तेच दिसू लागतं. लहानपणी शिक्षकांच्या, घरच्यांच्या धाकाने पाठ केल्यावर जसे सतत पाढेच डोक्यात फिरायला लागायचे, तसंच कोणाच्याही धाकाशिवाय हा प्रेमाचा पाढा अखंड डोक्यात घर करून बसतो …

एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
पाढा तिच्या नावाचा मी म्हणतोय येता जाता ॥ धृ ॥

एक दिवस करायचाय गं नक्की तुला फोन
विचाराने कावरेबावरे डोळे माझे दोन
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
आवाज तुझा ऐकल्याशिवाय करमत नाही आता ॥ १ ॥

तीन मैत्रिणी म्हणती भेटला नाहीस दिवस फार
चल पिक्चरला जाऊ म्हणतात मित्र माझे चार
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
आता इतर कोणाच्याच आवडत नाहीत बाता ॥ २ ॥

पाच देव पूजतोय भेट व्हावी म्हणून पाहा
कॉलेजमध्ये वाट पाहातो तुझी तास सहा
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
झालंय काय काळजीत पडले माझे पिता माता ॥ ३ ॥

सात दिवस पडली नाही तुझी माझी गाठ
अंधारून गेल्या माझ्या दिशा जशा आठ
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
नाकात गेला चमचा माझा ब्रेकफास्ट खाता खाता ॥ ४ ॥

नऊ आले नाकी गोड लागत नाही चहा
विसरून गेलो पाढा जेव्हा दिवस झाले दहा
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
दुसरा पाढा सुरू झाला पहिला संपून जाता ॥ ५ ॥

एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
पाढा तिच्या नावाचा मी म्हणतोय येता जाता ॥ धृ ॥

शेअर करा
8

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा


पुढे वाचा...

2 Comments

  1. विवेक म्हणतो आहे:
    फेब्रुवारी 14, 2020 येथे 8:14 PM

    अप्रतिम लेखन आणि अनेक धन्यवाद

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      फेब्रुवारी 18, 2020 येथे 8:46 AM

      मनःपूर्वक आभार..

      उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो