सप्टेंबर 15, 2025
राष्ट्रीय अभियांत्रिकी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! सर मोक्षगुंडम विश्वेशवरय्या ह्या विलक्षण भारतीय अभियंत्याच्या जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या सामाजिक माध्यमं, दूरचित्रवाणी, बँका, सरकारं वगैरेंनी प्रक्षेपित केलेल्या आभासी जगात, आपण ह्या साऱ्याचा पाया असलेल्या भौतिक जगाला कमी लेखू लागलो आहोत. मात्र ह्या पायाचं महत्त्व एक अभियंता खचितच जाणून असतो.. वस्तू असो वा वास्तू थांबे तेव्हा मी ती बनता मी तर अभियंता ॥ दूर सारते भ्रांती औद्योगिक ती क्रांती माझ्यामुळेच युद्ध जरी तरी माझ्यामुळेच शांती मी केवळ साहित्य बनवतो नाही कुणाशी तंटा मी तर अभियंता ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ObxKzcqpthI ह्या ठिकाणी ऐकता येईल.









