जानेवारी 1, 2026
लहानपणी ऐकलेल्या अनेक गोष्टींमध्ये देवाला प्रसन्न करून वर मागून घेणं ह्या गोष्टीचं अत्यंत आकर्षण वाटत असे. तुम्हाला खरंच जर देव पावला तर तुम्ही काय वर मागाल ह्याचा तुम्ही कधी विचार केलाय? थिल्लरपणे नाही, खोल, गंभीर विचार करून... एकदा प्रयत्न करून पाहा. वाटतं तितकं ते सोपं नाही.. मला देव पावला.. माझ्या पुढ्यात उभा ठाकला गालातल्या गालात हसत म्हणाला, तुला एक वर देतो माग काय हवंय ते.. पण.. फक्त स्वतःकरता मी नास्तिक.. मीच का?? समजलं नाही.. काय गारुड घातलं कुणास ठाऊक पण.. मी विचार करू लागलो ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/emRYrEG4INo ह्या ठिकाणी ऐकता येईल.









