नोव्हेंबर 25, 2022
आज आंतरराष्ट्रीय स्त्रियांवरील अत्याचार विरोधी दिवस आहे. स्त्रीच्या नकारातच होकार दडलेला असतो वगैरे भंपक कल्पनांना पुरुषप्रधान समाज नेहमीच खतपाणी घालत आला आहे. स्त्रियांची छेड काढणं ह्यात स्त्रियांनाही आनंद मिळतो असले पुरुषांनी करून घेतलेले गोड गैरसमज किती अवाजवी आहेत हे जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळेल .. समजून चुकली तीही बहुधा बोले माझी नजर टाळू लागली मला आणि सावरू लागली पदर ॥ झाला असता स्पर्श माझा चुकार तो सवंग सावरून बसली ती आपलं चोरून घेतलं अंग ॥ ठाऊक होता खेळ मला जाणार नव्हतो हार आयुष्यातील माझ्या नव्हती पहिली ही शिकार ॥ ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/4FLpIxG9bac ह्या ठिकाणी ऐकता येईल.









