logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
शिल्पकार
नोव्हेंबर 14, 2019
प्रेमाचा पाढा
फेब्रुवारी 14, 2020
सल
डिसेंबर 12, 2019
सामाजिक माध्यमांनी (social media) लोकसंवादात क्रांती घडवून आणली आणि कधी नव्हे ते राजकारणाने मध्यमवर्गीयांच्या घरात प्रवेश केला. ह्या गोष्टीचा फायदा जरी झाला असला तरी मनामनांतील तेढ वाढवण्याकरता त्याचा वापर ज्याप्रकारे होत आहे त्याचा सल आता मनाला बोचू लागला आहे …

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/QNgYIUgYAjw ह्या ठिकाणी ऐकता येईल.

शाळेतील वर्गात, बाकावर बसणारे मित्र काही बरे काही चांगले
शाळा संपल्यावर सगळेच आपापल्या विश्वांत पांगले ॥

काळाबरोबर घरंगळत जाऊन मीही रमलो आपल्या विश्वात
आधी शिक्षण मग नोकरी आणि मग लग्नाच्या बंधनात ॥

ज्या सुमारास कौटुंबिक आणि आर्थिक आघाड्यांवर स्थैर्य आलं
त्याच सुमारास सोशल मिडियाच्या वादळाचं जगात आगमन झालं ॥

अचानक पांगलेले सारे मित्र ह्या सोशल मिडियावर लागले भेटू
वर्तमानाला भूतकाळाशी जोडणारा तो होता जणू एक सेतू ॥

दशकं लोटली होती त्यांच्याबरोबर गप्पा मारून, खेळून
नुसती नावं ऐकूनच मन आलं उचंबळून ॥

फोटो पहिले त्यांचे किती मोठे किती वेगळे दिसत होते ते आज
आपल्याबद्दल त्यांनाही असंच वाटत असेल, मनात वाटली थोडी लाज ॥

कुणी अधिकारी कुणी उद्योगपती कुणी बसवलं होतं परदेशी बस्तान
त्यांची प्रगती वाचून वाटला जेवढा हेवा तेवढाच अभिमान ॥

Sal2

सोशल मिडियावरील लिखाणामुळे समजू लागली त्यांची हालहवाल
आणि इथेच पहिल्यांदा चुकचुकली मनात शंकेची एक पाल ॥

काही जणांचे लिहिले जाणारे विचार मनात लागले सलू
वस्तुस्थिती समजू लागली काही दिवसांनी हळूहळू ॥

कुणी धर्माबद्दल कुणी जातीबद्दल कुणी भाषेबद्दल होतं बोलत
आमच्या शाळेत आम्हाला हे कुणीच कधीच नव्हतं शिकवत ॥

असे कसे झाले होते ह्यांचे विचार एवढे कोते
वयाने वाढलेले माझे काही मित्र विचारांनी मात्र झाले होते छोटे ॥

कौटुंबिक स्थैर्य आर्थिक सुबत्ता असतानाही द्वेषाचा हा कहर
पुढल्या पिढीच्या मनात कुठलं आणि किती भरतायत हे जहर ॥

आता सोशल मिडियावर गप्प बसण्याकडेच असतो माझा कल
वाईट वाटतं तरी दाबून ठेवतो माझ्या मनातला ठसठसणारा सल ॥

शेअर करा
7

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो