logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
केस
ऑक्टोबर ३०, २०२०
अनादी अनंत लढा
नोव्हेंबर १८, २०२०
विसात नव्वद शोधू नको
नोव्हेंबर ८, २०२०
‘हल्लीच्या मुलांना काही ताळतंत्र राहिलेलं नाही’ किंवा ‘आमच्या वेळेला हे असलं वागणं मुळीच खपवून घेतलं जात नसे’ ही विधानं अनादी काळापासून आजतागायत केली जात आहेत. जुनी पिढी नव्या पिढीला लहानाचं मोठं होताना बघते जे त्यांना स्वीकारता येत नाही आणि नव्या पिढीला जुनी पिढी अडगळ वाटू लागते. कालचक्राची अपरिहार्यता लक्षात आली की जुनी पिढी नव्या काळात आपला जुना काळ शोधू लागते …

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/qVDHSn-KCr4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.

कालचक्र हे फिरतच राही दुःख वृथा तू करू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ धृ ॥

जुनी जाहली तुझी पिढी अन् नवी पिढी हे सरसावे
तुझ्या पिढीच्या स्वप्नांमागे नवी पिढी ती बघ धावे
काळाची ही नदी वाहती उगाच तिजला अडवू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ १ ॥

थेटरातले जाती सिनेमे बघती सारे फोनवरी
क्रिकेटमधली षटके आली पन्नासाहून वीसवरी
कोहली बुमराच्या ह्या काळी सचिन कुंबळे आठवू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ २ ॥

हॉटेलाचे जेवण होते कधीकाळची चैन खरी
इंटरनेट आता दिमतीला हॉटेलच ते येई घरी
नवीन पिढीचे आरोग्य घटते उगाच गमजा करू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ ३ ॥

गाळावा लागत होता तुज मित्राला भेटण्यास घाम
काय बिघडले मैत्रीकरता वापरले जर इन्स्टाग्राम
करुनी ओरडा साप साप तू आता भुई धोपटू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ ४ ॥

तंत्रज्ञानाची ही भरारी उंच जातसे वेगाने
संगणकाचे अप्रूप तुजला फोन आता पुरतो जाणे
डायलवाल्या कृष्णफोनच्या आठवणींनी झुरू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ ५ ॥

पिकले केस लागला चश्मा निवृत्ती दिसते पुढती
जबाबदाऱ्या कमी जाहल्या कामे ना तुजवीण अडती
छंद जोपास कामावरती उशिरापर्यंत थांबू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ ६ ॥

नव्वदात होते थोडे ते ऐंशी सत्तर साठही रे
नवीन सहस्रक असे निराळे बांधून घे तू गाठ ही रे
सज्ज उड्डाण करण्याकरता नवी पिढी थांबवू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ ७ ॥

कालचक्र हे फिरतच राही दुःख वृथा तू करू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ धृ ॥

शेअर करा
5

आणखी असेच काही...

फेब्रुवारी १४, २०२१

ती भेटली परंतु ..


पुढे वाचा...
फेब्रुवारी ७, २०२१

कूस


पुढे वाचा...
जानेवारी १७, २०२१

माझाच देव महान


पुढे वाचा...

रसिकांची प्रामाणिक प्रतिक्रिया ही लेखकाकरता प्राणवायू असते. तेव्हा बिनधास्त प्रतिक्रिया देताना मागे पुढे पाहू नका! उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अॅड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फिल्ड्स * मार्क केले आहेत.
(मराठीत प्रतिक्रिया देण्याकरता https://www.google.com/intl/mr/inputtools/try/ ह्या संकेतस्थळावर इंग्रजीत type करा व रुपांतरीत मराठी मजकूर खालील चौकटीत copy / paste करा.)

5 × 4 =

नविनतम लेखन

  • ती भेटली परंतु .. फेब्रुवारी १४, २०२१
  • कूस फेब्रुवारी ७, २०२१
  • विस्तव – भविष्याचा इतिहास जानेवारी २४, २०२१

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो