logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
इन द लाँग रन…
ऑक्टोबर 5, 2012
डोरेमॉन
जानेवारी 4, 2013
बाथरूममधला मी
नोव्हेंबर 2, 2012
आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे स्वतःकरता एकांताचा क्षण मिळणं दुर्लभ झालं आहे. आपण दिवसभर सतत कोणत्या ना कोणत्या व्यक्तीबरोबर ‘वागत’ असतो. समोरच्या व्यक्तीनुसार आपले मुखवटे बदलत असतो. म्हणूनच आपण खरे कसे आहोत हे समजून घ्यायचं असेल तर एका जागेला पर्याय नाही … बाथरूम!

लहानपणी गिरवत होतो व्रात्यपणाचा कित्ता
आता मुलांसमोर होतो मोठा तत्ववेत्ता
मित्रांमध्ये विनोद करतो बायको करते छळ
तिच्यासमोर मात्र होतो दमयंतीचा नळ
आर्इवडिलांना भेटून लोटतो वर्षभराचा काळ
समोर त्यांच्या जाता होतो माझा श्रावणबाळ
माझ्याच घरात आहेत कितीतरी मुक्कामाला मी
बाकी सगळे खोटे खरा बाथरूममधला मी || १ ||

लिफ्टमध्ये जेव्हा शिरते शेजारीण ती छान
पोट आत छाती बाहेर माझा सुपरमॅन
घरी दारी एरवी असतो चेहरा गोरा मोरा
पण लिफ्टमन अन् चौकीदारासमोर मोठा तोरा
गाडी अशी चालवतो की मर्कट मद्य प्याला
एसीमध्ये बसून शिव्या देतो ज्याला त्याला
रूपं माझी असंख्य ती दाखवी समाजाला मी
बाकी सगळे खोटे खरा बाथरूममधला मी || २ ||

वरिष्ठांच्या ऐकून घेतो मुकाट मी डरकाळ्या
कनिष्ठांवर डुरकावतो मग जशा असाव्यात शेळ्या
सप्लायर्सशी अरेरावी ते आहेत जणू काही चाकर
कस्टमर्सशी बोलताना पण तोंडात घोळते साखर
शिपायाला उशीर झाला मारतो त्याला फाइन
सेक्रेटरीवर साहेबाच्या अन् मारून बघतो शाइन
जशी भेटतील माणसं तसाच रंग बदलला मी
बाकी सगळे खोटे खरा बाथरूममधला मी || ३ ||

मित्रांवरती खर्चासाठी होतो मी दिलदार
स्वत:वरती खर्च करतो दहादा विचार
फेसबुकवरती अण्णाजींना देतो माझं वोट
लाचेकरता तयार खिशात पन्नाासाची नोट
सुविचार पाठवतो सर्वांना संस्कृतीला तू जाग
काॅलर ट्यून माझी भाग भाग डिके बोस भाग
कुणासमोर काय बनू अस्सा घाबरलेला मी
बाकी सगळे खोटे खरा बाथरूममधला मी || ४ ||

बाथरूममध्ये मात्र माझा मीच सर्वेसर्वा
कोण काय म्हणेल ह्माची नसते मजला पर्वा
पोट असेल सुटलेलं अन् केसाळ असेल पाठ
टक्कल असेल पडलेलं अन् पुढे असतील दात
आरशासमोर उभा राहून वेंगाडतो मी तोंड
कुठला लावू मुखवटा ही ठेवत नाही नोंद
सोंगाड्याची रूपं लेवून वावरलेला मी
बाकी सगळे खोटे खरा बाथरूममधला मी || ५ ||

शेअर करा
3

आणखी असेच काही...

नोव्हेंबर 18, 2020

अनादी अनंत लढा


पुढे वाचा...
नोव्हेंबर 8, 2020

विसात नव्वद शोधू नको


पुढे वाचा...
ऑक्टोबर 10, 2020

रडू


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • कवीराज मार्च 21, 2021
  • ती भेटली परंतु .. फेब्रुवारी 14, 2021
  • कूस फेब्रुवारी 7, 2021

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो