logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
लक्ष कुठे
जानेवारी 2, 2015
Streemukti
स्त्रीमुक्ती
मार्च 3, 2015
दोन देश
जानेवारी 16, 2015
भारत हा विरोधाभासांचा देश आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आपली लोकसंख्याच एवढी आहे की विरोधी विचारसरणीच्या लोकांची टक्केवारी जरी कमी असली तरी त्यांचा आकडा मोठा असू शकतो. ह्या विरोधाभासांकडे कधी नाईलाजाने, कधी सोयीस्करपणे तर कधी निर्ढावल्याप्रमाणे दुर्लक्ष करायला आपण शिकलो आहोत . . .

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/dvRP__5wF9U ह्या ठिकाणी ऐकता येईल.

कुठे जंगल हे घनदाट
कुठे उजाड शहरी थाट
खेटून एकमेकात
हे दोन्ही देश माझे ||

कुठे पुरात बुडती गावे
कुणी पाण्याकरता धावे
कुणी कसे काय सांगावे
हे दोन्ही देश माझे ||

कुठे कांदा भाकर जाडी
कुणी मेजवानीही झोडी
हो अन्नााची नासाडी
हे दोन्ही देश माझे ||

जीव घेती साधे आजार
कुठे लाखांचे उपचार
औषधांसाठी लाचार
हे दोन्ही देश माझे ||

कुणा शिक्षण पदव्युत्तर
कुणी अंगठा बहाद्दर
तरी जगणेच समांतर
हे दोन्ही देश माझे ||

कुणी कमवती कोटी कोटी
कुणा नोकरीही न छोटी
दरी वाढत जार्इ मोठी
हे दोन्ही देश माझे ||

कुठे टोलेजंग महाल
कुठे झोपडीतले हाल
वसे एकत्रच भवताल
हे दोन्ही देश माझे ||

काही खेळ कमविती अपार
बाकींना नाही आधार
कुणी सोसावा हा भार
हे दोन्ही देश माझे ||

नेते साठविती धन
त्यांना दूषण देती जन
तरी देती त्यांस आसन
हे दोन्ही देश माझे ||

जाती चंद्र मंगळावरी
घरी बाबांच्या तसबिरी
अंधश्रद्धा वसते उरी
हे दोन्ही देश माझे ||

परदेशाची स्वच्छता
डोळे दिपविते पाहता
लाज नाही पण थुंकता
हे दोन्ही देश माझे ||

गातो एकतेचे गुण सारे
पण धर्म जातही प्यारे
भिंती बांधून अडवू वारे
हे दोन्ही देश माझे ||

अशी अलभ्य ती संस्कृती
अन् फसविण्याची विकृती
दिसे प्रत्येकाची कृती
हे दोन्ही देश माझे ||

शेअर करा
49

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं


पुढे वाचा...
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो