logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
षंढ
जुलै 16, 2011
निवडक दृष्टी
जुलै 20, 2012
तारीख
नोव्हेंबर 4, 2011
११.११.११ ही तारीख जसजशी जवळ येत चालली आहे तसतशा काही सुरस आणि चमत्कारिक बातम्या ऐकायला मिळत आहेत. जन्माची संभाव्य तारीख अगोदरची असेल तर जोडपी डॉक्टरांना प्रसूती पुढे ढकलण्याचे उपाय विचारात आहेत. नंतरची असेल तर त्या दिवशी सिझेरिअन करायला सांगत आहेत. समारंभांच्या कार्यालयांचे त्या दिवसाचे दर दुप्पट तिप्पट झाले आहेत. आपल्या आयुष्यात तारखेचं महत्व खरच किती आहे नाही!

पटवून देण्या खरंच तुमचा जन्म आहे झाला
जन्माच्या त्या दाखल्यावरती आधी तारीख घाला
वाढदिवसाची तारीख घालते आनंदाशी सांगड
तारखा असतात आयुष्यातील मैलाचे दगड || १ ||

कधी जन्मला शिवबा तर कधी सिकंदराची स्वारी
स्वातंत्य्राच्या लढ्यामध्ये तारखा असतात भारी
जन्म मॄत्यू भल्याभल्यांचे लक्षात ठेवणे अवघड
तारखा असतात आयुष्यातील मैलाचे दगड || २ ||

कोणत्या तारखेस येणार आहेत ह्मा वर्षीचे सण
शाळेकरता सुट्टी म्हणजे हर्षाचे आंदण
परीक्षांची तारीख लागली अभ्यास मग रग्गड
तारखा असतात आयुष्यातील मैलाचे दगड || ३ ||

बघता बघता लग्न ठरतं तारीख होते नक्की
तारखेला त्या आयुष्यातील नाती होतात पक्की
तारखेची त्या साक्ष चढण्या संसाराचा गड
तारखा असतात आयुष्यातील मैलाचे दगड || ४ ||

वीज फोन विमा मारा बिलांचा तो सारखा
महिन्यामागून महिने भरा पाळत साऱ्या तारखा
पुरत नाही मिळकत चढता तारखांचा हा गड
तारखा असतात आयुष्यातील मैलाचे दगड || ५ ||

किती तारखा लक्षात ठेवू तारखेमागून तारीख
निवडणुकीची तारीख आणि वर्ल्डकपची तारीख
कर भरायची तारीख चुकली दंड बसेल सज्जड
तारखा असतात आयुष्यातील मैलाचे दगड || ६ ||

विचार येतो तारखांमागे करता धावाधाव
आणखीन एका तारखेवरती लिहिलंय आपलं नाव
मग रहाणार नाही कोणत्या तारखेची निकड
तीच आपली तारीख शून्य मैलाचा दगड || ७ ||

काही अभिप्राय

  • महेश अम्बुर्ले
    एक सुंदर कविता share केल्याबद्दल धन्यवाद.
    महेश अम्बुर्ले
    ०४.११.२०११
शेअर करा
2

आणखी असेच काही...

जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं


पुढे वाचा...
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..


पुढे वाचा...
डिसेंबर 1, 2021

देव बसला वर ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022
  • छेड नोव्हेंबर 25, 2022
  • देव मे 23, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो