logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
मिच्छामी दुक्कडम
सप्टेंबर 6, 2013
मॉर्निंग वॉक
ऑक्टोबर 4, 2013
उपरा
सप्टेंबर 20, 2013
लोकशाही म्हणजे बहुमताचा मान . . . पण मग बहुमताने अराजक माजलं तर त्याचाही मान ठेवायचा का? माझ्या सभोवती बहुतांश लोक जर मग्रुरी, लबाडी, अस्वच्छता, असहिष्णुता, भ्रष्टाचार ह्या गोष्टींचा पुरस्कार करत असतील तर मीसुद्धा त्यांच्यासारखं बनावं का? आणि नाही बनलो तर मी ह्या देशात राहायला नालायक ठरतो का?

पुन्हा उत्सव आज
बटबटीत तो बाज
कानांवरच्या हातांमधुनी ठणठणतो आवाज

रस्त्यामध्ये मांडव
दिवसरात्रीचे तांडव
रांगा लावून दर्शन घेती पंचक्रोशीतील बांधव

माझा सोडून प्रत्येकाचा चेहरा आहे हसरा
माझ्या देशामध्ये कसा हा मीच जाहलो उपरा || १ ||

थुंकतो कुणी थेट
फेके कुणी सिगरेट
कचरा करण्यासाठी लावला सार्‍यांनी जणू नेट

घाण पुढे अन् पश्च
नाक धरावे गच्च
साबण लावून स्नान करावे तरी वाटे अस्वच्छ

बाकी सारे मजेत केवळ मलाच दिसतो कचरा
माझ्या देशामध्ये कसा हा मीच जाहलो उपरा || २ ||

सांगतो कुणी जात
कुणी धर्माची बात
कुणी राहतो भाषा प्रांतांच्या भिंतींच्या आत

कुणी पत्नीला छळे
कुणी छेडी मुलींना बळे
कुणी आपुल्या कन्यांचे गर्भात कापतो गळे

परंपरांच्या पडद्याखाली म्हणती विवेक विसरा
माझ्या देशामध्ये कसा हा मीच जाहलो उपरा || ३ ||

सगळे देती लाच
सगळे खाती लाच
नियम तोडणे प्रत्येकाने छंद जोडिला हाच

उद्योग आणि शेती
सारे लुटुनी नेती
मते जिंकुनी जनतेची तरी पुन्हा निवडुनी येती

मणी सर्व एका माळेचे कुणीच नाही दुसरा
माझ्या देशामध्ये कसा हा मीच जाहलो उपरा || ४ ||

इथे जन्म जाहला
पैसाही मिळवला
देशाच्या प्रगतीचा मोठा लाभ मिळाला मला

परदेशी मी जार्इ
पाहून तेथील सोयी
परतून येता वाटे मी अडकलो कोणत्या डोही

कसा लपावा स्वार्थी माझ्या भाव मनीचा दुखरा
माझ्या देशामध्ये कसा हा मीच जाहलो उपरा || ५ ||

आवडे जे बहुजना
वाटे मजला घृणा
मीच शहाणा तुच्छ बाकीचे करून घेर्इ धारणा

माझा वर्ग विशेष
उच्च राहणी वेश
देशामध्ये जणू जाहले दोन निराळे देश

देश बदलेल माझ्यासाठी सुदिन जाणीन खरा
माझ्या देशामध्ये कसा हा मीच जाहलो उपरा || ६ ||

शेअर करा
61

आणखी असेच काही...

जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं


पुढे वाचा...
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..


पुढे वाचा...
डिसेंबर 1, 2021

देव बसला वर ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022
  • छेड नोव्हेंबर 25, 2022
  • देव मे 23, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो