प्रेमाचा धंदा
फेब्रुवारी 21, 2014मनाने चांगला
मे 16, 2014उडदामाजी काळे गोरे
जनतेशी निगडीत असा साऱ्या जगातील भव्यतम सोहोळा – भारतीय लोकसभेची निवडणूक! आणि ह्या सोहोळ्याचे उत्सवमूर्ती, निवडणुकीचे उमेदवार . . . अहाहा, काय वर्णावी त्यांची महती! एकास झाकावे आणि दुसऱ्यास काढावे . . .
काही हिरवे काही पिवळे
काही नास्तिक काही धार्मिक
कोणी मिशी कोणी दाढी
कोणी ग्रामीण कोणी शहरी
कोणी जहाल कोणी मवाळ
हे तर हसरे हे तर चिडके
कोणी गिचमिड कोणी कोरे
उद्घाटनेच ह्यांच्या हस्ते
मोठी पोस्टर्स गल्लोगल्ली
येई स्कॉर्पिओ येई ॲकॉर्ड
दोन वर्षांत चार गाड्या
बडबड मोठी काम धाकटे
समाजकारण निघती कराया
ह्यांचे गुंड ह्यांची पोरे
ज्यांचे गुन्हे ज्यांचे खटले
ज्यांनी केली ना दंडेली
पद जोवर चाटा पाय
ज्यांचा विरोध त्यांना करा
संप बंद धडक मोर्चा
कुठले कुठले देऊन नारे
देखे जनता जैसी ढोरे
जेवण नाही शाळा नाही
देशाचा ह्या एकही हिस्सा
कोळसा नाही चारा नाही
ओरपण्याची वृत्ती असता
मोठे शुक्र छोटी झारी
दिमाख आणि पतही वाढे
खाऊ डोंगर खाऊ खोरे
काही भगवे काही निळे
किती कपाळे किती टिळे
कोणी सदरे कोणी साडी
कोणी व्हिस्की कोणी ताडी
कोणी काटे कोणी प्रवाळ
हे तर सभ्य हे तर टवाळ
उडदामाजी काळे गोरे || १ ||
कधी बगीचे तर कधी रस्ते
कुणास अडचण पर्वा नसते
जाई स्कोडा जाई फोर्ड
पाहून पडेल तोंड कोरडं
गळ्यात देव बाहेर भामटे
बोटांत अंगठ्या सहीस अंगठे
उडदामाजी काळे गोरे || २ ||
त्यांचेच बळ सर्वां पटले
त्यांचे मग अनुयायी घटले
गेल्यावरती ओढा पाय
दे माय धरणी ठाय
पटत नाही ह्यांना चर्चा
क्षणात निघती भाले बर्च्या
उडदामाजी काळे गोरे || ३ ||
क्रीडा नाही कला नाही
तावडीमधून सुटला नाही
माती नाही वारा नाही
विवेकास मग थारा नाही
नाव ह्याचे दुनियादारी
झाली जर का तुरूंगवारी
उडदामाजी काळे गोरे || ४ ||
बदल घडतो असा विलक्षण
करण्याला मग तयार होती
शिव्या विसरती सुहास्य वदता
आश्वासनांस नाही तुटवडा
दानधर्म मग जिकडे तिकडे
गरीबवस्तीमध्ये जाऊनी
लाचार हसू अन् बळजोरे
ह्याला सोड त्याला जोड
शत्रू होते क्षणापूर्वी जे
भाऊ ठाकला भावासमोर
शत्रूसुद्धा अवाक् होती
धर्म काढ जात काढ
मतांकरता काही चालेल
जेथील बाभळी तेथील बोरे
संपला फड संपला नाच
शो संपला असे म्हणत
पोलीस करती अत्याचार
धनको आणि ऋणकोमधले
शेतकरी करी आत्महत्या
कायदा आणि सुव्यवस्था
कधी वाटते देश नको रे
जेव्हा येई पुढील इलेक्षन
जनतेकरता अग्नीभक्षण
ताठा जाऊन येई नम्रता
हात जोडूनी भाषण करता
कुणास कांबळ कुणास लुगडे
उचलून घेती बालक उघडे
उडदामाजी काळे गोरे || ५ ||
ह्याला गिरव त्याला खोड
आता नाते झाले गोड
लक्तरं काढी गावासमोर
नातलगांच्या डावासमोर
भाषा काढ प्रांत काढ
आवस वाढ बये आवस वाढ
उडदामाजी काळे गोरे || ६ ||
भकास तंबू वर्षे पाच
जनता लागे झिजवू टाच
गरीब बनती गुन्हेगार
अंतर वाढे अपरंपार
शहरी वाढती झोपडपट्टया
म्हणत सरकार लावी दट्ट्या
उडदामाजी काळे गोरे || ७ ||