logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
तिची आणि माझी भेट
जून 17, 2011
जाणार नाहीस ना
ऑक्टोबर 3, 2014
शेवटची भेट
जानेवारी 20, 2012
मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या प्रेमात पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात “मी तुझ्याकडे ‘तशा’ नजरेने कधी पाहिलंच नाही” ह्या विधानाची जबरदस्त धास्ती असते. आणि मग एकदा का हे विधान ऐकावं लागलं तर ती मैत्री तरी अबाधित राहू शकते का?

तुला पहिल्या प्रथम पाहिलं तेव्हा मन म्हणालं हीच ती
बहुदा अशीच बनत असावीत जन्मजन्मांची नाती
वाट पहायचो वेड्यासारखा कधी होर्इल आपली पुढची भेट
तुझं भरभरून बोलणं, खळखळून हसणं भिडून जायचं काळजाला थेट
आपल्यात पुरूषांनीच घ्यायचा असतो म्हणे पुढाकार
म्हणून विचारून टाकलं एक दिवस म्हंटलं होऊन जाऊ दे आर या पार
चेहरा पडाला तुझा आमचं जहाज पार नाही आरच राहिलं
हळू आवाजात म्हणालीस तुला ‘तशा’ नजरेने कधीच नाही पाहिलं
थिजून गेल्या साऱ्या होत्या इच्छा माझ्या मनी दहा
तरी एकच इच्छा मनात आहे जीवनात तू सुखी रहा || १ ||

मिळेल तुला… कदाचित मिळालाही असेल तुझ्या स्वप्नातला राजकुमार
विचार जरी मनात आला तरी त्रास होतो फार
आयुष्य सुरूच राहातं, माझ्याहीकरता ते थांबणार नाही एवढं नक्की
मलाही कोणी मिळेल ही गोष्ट मला ठाऊक आहे पक्की
मित्र मारतील कोपरखळ्या, समजेल मला त्यांच्या बोलण्यातील खोच
हसण्यावरी नेर्इन सारं पण मनात नक्कीच राहील एक बोच
खरं सांगतो तुला, तुझ्याशी बोलूच शकत नाही मी खोटं
पण तुझा दुस्वास करावा एवढं माझं मन नाही कोतं
आत्ता तरी वाटतंय तुझ्यावाचून जगणं कठीण महा
तरी एकच इच्छा मनात आहे जीवनात तू सुखी रहा || २ ||

नकार दिलास तू आणि आपल्यातला मोकळेपणा संपला
जोर लावून उघडला की जसा दुभंगून जातो शिंपला
भेटी संपल्या आपल्या… काही कारणच नव्हतं मिळत
आणि खरं सांगू? कारण मिळालं तरी भेटायचं मीच होतो टाळत
आज मला विचारते आहेस का वागतोयस असा वेड लागल्यासारखा
एवढा जवळचा मित्र माझा असा कसा झालास पारखा
आज शेवटचं सांगून टाकतो ह्मा मैत्रीचा कंटाळा आलाय मलाही
कारण तुला कधी ‘तशा’ नजरेनं मी मुळी पाहिलंच नाही
शेवटची ही भेट आपली निक्षून तुला सांगतोय पहा
पण तरीही… एकच इच्छा मनात आहे जीवनात तू सुखी रहा || ३ ||

शेअर करा
1

आणखी असेच काही...

फेब्रुवारी 14, 2022

प्रेमात पडल्यावर काय होतं


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2021

ती भेटली परंतु ..


पुढे वाचा...
जून 27, 2020

चुटपुटती ती भेट


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022
  • छेड नोव्हेंबर 25, 2022
  • देव मे 23, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो