logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
माझी शाळा
जून 12, 2020
लोकमान्य
ऑगस्ट 1, 2020
चुटपुटती ती भेट
जून 27, 2020
आपल्या रोजच्या ताणतणावाने भरलेल्या आयुष्यात कधीतरी एखादी व्यक्ती अशी भेटते की तिच्या सांनिध्यात काही वेळाकरता का होईना आपण आपले सारे ताणतणाव विसरून जातो. इतकंच नव्हे तर ती व्यक्ती परत कधी भेटेल ह्याची शाश्वती नसेल तरीही त्या चुटपुटत्या भेटीची आठवण आपल्याला आयुष्यभर पुरते…

ही कविता यूट्यूबवर ह्या https://youtu.be/ErJh-nU6XEk ठिकाणी ऐकता येईल.

ओळख तुझी करून घेणं अर्धंच राहून गेलं बघ
चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥

कॉफीशॉपच्या टेबलपाशी एकटीच वाचत बसली होतीस
फ्लाईट लेट झालं म्हणून जगावर हिरमुसली होतीस
कुठे जाणार होतीस विचारणं अर्धंच राहून गेलं बघ
चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥

जागा नव्हती इतर कुठेच म्हणून तिथे येऊन बसलो
पुस्तकातून वर बघणाऱ्या तुला बघून बळेच हसलो
पुस्तकाचं नाव बघणं अर्धंच राहून गेलं बघ
चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥

सुरुवातीचं अवघडलेपण जाऊन मोकळी होत गेलीस
माझ्याही अन् मनातली तू किल्मिषं सारी दूर केलीस
तेवढ्यात तुझं नाव विचारणं अर्धंच राहून गेलं बघ
चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥

काय गप्पा मारल्या एवढ्या आठवत नाही जरासुद्धा
गप्पा होत्या अवीट मात्र हाच तर होता खरा मुद्दा
बघत राहणं तुझं हसणं अर्धंच राहून गेलं बघ
चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥

भाळावरची एक बट गालावरती येत होती
गालावरच्या खळीपासून लक्ष विचलित करत होती
बट तुझी ती मागे सारणं अर्धंच राहून गेलं बघ
चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥

घोषणा तेवढ्यात झाली एक भानावरती आलीस ऐकून
तुझी उडाली एकच धांदल पर्स पुस्तकं घेता आवरून
तुझी पडलेली खुर्ची उचलणं अर्धंच राहून गेलं बघ
चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥

इतक्या कमी वेळात मला किती आनंद देऊन गेलीस
तात्पुरते का होईना माझे सारे तणाव घेऊन गेलीस
कसं जमलं तुला विचारणं अर्धंच राहून गेलं बघ
चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥

ओळख तुझी करून घेणं अर्धंच राहून गेलं बघ
चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥

शेअर करा
6

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो