logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
अघोरी
जून 3, 2011
अनाथ
ऑक्टोबर 21, 2011
बेडूकशाही
ऑगस्ट 19, 2011
एकदा एका तळ्यातील बेडकांना साक्षात्कार झाला की आपल्यातील एखाद्या बेडकालाच जर राजा नेमलं तर तो आपल्या तळ्याचं भलं करेल. त्यानंतर ह्या तळ्यात आलेल्या बेडूकशाहीमुळे त्या बेडकांना काय काय भोगावं लागलं त्याची ही कथा. आपलं बरं आहे, आपण बेडूक नाही … लोक आहोत …!

देव चालला होता फारच सुरेख होते जंगल
जंगलामध्ये तळे होते परंतु फार अमंगल
तळ्यामध्ये त्या बेडूक होते त्यांना देव पुसे
इतक्या घाणीत सर्व जन तुम्ही राहता तरी कसे

सांगणार कोणा काय कुणाचे ऐकत कोणी नाही
तळ्यामध्ये ह्या माजे आमुच्या अशी बेबंदशाही || १ ||

सारे बेडूक गोळा झाले देवाजीच्या भवती
राजा द्या हो आम्हा सांगूनी त्याच्यासमोर लवती
देव सांगतो चर्चा करूनी सोडवा तुम्ही कलह
विकल्प नाही राजावाचून धरती ते आग्रह

कंटाळूनी ओंडका देऊनी देव तेथून जाई
तळ्यामध्ये त्या सुरू जाहली तेध ओंडकेशाही || २ ||

धबालकन ओंडका पडे तो तळ्यात उठती लाटा
घाबरले ते बेडूक सारे धडगत नाही आता
भीड चेपता एक तयावर बेडूक जाऊन बसला
हालत नाही डोलत नाही राजा असला कसला

पुन्हा सांगती बेडूक देवा उपाय करावा काही
देवाने मग साप धाडला आली सर्पशाही || ३ ||

नवीन ह्या राजाची काही न्यारीच होती बात
समोर जो जो दिसेल त्याला सुटला तो तर खात
बेडकांना त्या कळून चुकली आपली मोठी चूक
राजा म्हणून एक नेमला त्यांनी मग बेडूक

आपुला राजा आपुले हितच आपुल्याकरता पाही
असे म्हणोनी तळ्यात चालू झाली बेडूकशाही || ४ ||

राजाने त्या तडकाफडकी हुकूम केला जारी
झटतील सारे बेडूक सारा दिवस रात्र अन् सारी
हुशार काही बेडूक राजाला पण देती लाच
काम नको ते आम्हा तुजला किडे देऊ बघ पाच

किती आपुले महत्व तेव्हा राजा समजून जाई
तळ्यातील ती अशा प्रकारे घसरे बेडूकशाही || ५ ||

राजाने त्या जाहीर केला नवा लगोलग कर
मलाच देऊन जावा नसतील कष्ट करायचे तर
बघता बघता सारे भरती राजाचे त्या दाम
विकल्प असता कोण करतसे आपुले आपण काम

तळे राहिले गलिच्छ राजा महालात पण राही
अशा प्रकारे पसरू लागली तेथे बेडूकशाही || ६ ||

राजा गोळा करी गुंड ते बेडूक काही अन्य
म्हणतो त्यांना तुम्हा पोसतो तुम्हीच माझे सैन्य
गुंड ठेवती राजाची मग अशी काही बडदास्त
दंड देऊनी गप्प बसविती बोले कुणी जर जास्त

सैन्याने त्या अशी वसविली तिकडे दंडुकशाही
बोलायाची सोयच नव्हती होती बेडूकशाही || ७ ||

काही बेडूक म्हणती देवा भेटून यावे पुन्हा
असे बोलणे जाहीर केले राजाने मग गुन्हा
राजालाही चढला होता सत्तेचा तो चेव
लागू झाला नवीन कायदा राजा तुमचा देव

देवालाही समजत नाही बोलत कुणी का नाही
गलिच्छ पण त्या तळ्यात चाले तशीच बेडूकशाही || ८ ||

शेअर करा
4

आणखी असेच काही...

मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
नोव्हेंबर 25, 2022

छेड


पुढे वाचा...
जानेवारी 3, 2022

विद्ध


पुढे वाचा...

4 Comments

  1. प्रशांत धुमाळ म्हणतो आहे:
    सप्टेंबर 20, 2019 येथे 4:51 PM

    खूपच छान

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      सप्टेंबर 26, 2019 येथे 9:39 PM

      धन्यवाद..

      उत्तर
  2. प्रशांत धुमाळ म्हणतो आहे:
    सप्टेंबर 20, 2019 येथे 4:42 PM

    खूपच सुंदर.

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      सप्टेंबर 26, 2019 येथे 9:39 PM

      धन्यवाद प्रशांतजी..

      उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो