ऑगस्ट 7, 2015
'सर्वसाधारण नागरिक भ्रष्टाचारामुळे भरडला जात आहे' ह्याबाबत सर्वांचं एकमत आहे. पण अनेकदा सर्वसाधारण नागरिकाला भरडणाराही एक सर्वसाधारण नागरिकच असतो असा अनुभव येतो. भ्रष्टाचार म्हटलं की आपण लगेच राजकारण्यांच्या नावाने बोटं मोडतो पण नीट डोळे उघडून पाहिलं तर आजूबाजूला प्रत्येक पातळीवर भ्रष्टाचार सुरु असल्याचं जाणवतं. मग भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन व्हावं असं नक्की कोणाला वाटतंय? . . . रिक्षाचालक दुर्योधनाने मीटरमध्ये केला होता फेरफार युधिष्ठीर कारकून जेव्हा रिक्षाने स्टेशनवरून घरी गेला कारकून दुर्योधनाने कार्ड देण्यापूर्वी चहापाण्याकरता पैसे मागितले युधिष्ठीर पोलीस जेव्हा रेशन कार्ड बनवायला गेला पोलीस दुर्योधनाने गाडी अडवून लाच मागितली युधिष्ठीर डॉक्टरची गाडी जेव्हा चुकून सिग्नल तोडून पुढे गेली ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/pCaVDvsMjP4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.









