ऑक्टोबर 1, 2020
आज आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिवस आहे. वयोवृद्ध ह्या शब्दाचं सरकारी परिमाण काहीही असू दे, वृद्धपणा हा मानण्यावर असतो. प्रौढत्वी निज शैशवास जपणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्याला सभोवती दिसतात आणि त्याच वेळी अकाली वृद्ध होणाऱ्या व्यक्तीही दिसतात. वय हा केवळ एक आकडा आहे ह्यावर ठाम विश्वास असणाऱ्या व्यक्तींकडून तरुणांनाही बरंच काही शिकता येईल ... अघटीत घडले तेव्हा जेव्हा दुमडून गेला काळ एकदा सकाळीला भेटाया आली संध्याकाळ ॥ एकसारखे रूप दोघींचे विषय हा विस्मयाचा तोच वर्ण अन् तीच कांती पण फरक फक्त समयाचा भेटच नव्हती झाली कधीही होती खरंच कमाल एकदा सकाळीला भेटाया आली संध्याकाळ ॥ ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/hzXP-T5AFp4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.









