मे 15, 2015
तुम्ही वेळेवर कर भरता का? तुम्ही वाहतुकीचे नियम पाळता का? तुम्ही दुकानांत वस्तूंच्या पावत्या मागता का? तसं असेल तर तुम्ही गाढव आहात . . . दचकू नका. आपल्या देशात, जिथे जास्तीत जास्त कायदा मोडणाऱ्याला हुशार किंवा चतुर समजलं जातं, तिथे दुसरं काय म्हणणार? आयुष्यभर झुरतोय घ्यायला घर मोठं त्याने मात्र खोली बांधली जिथे अंगण होतं तरीही घरपट्टीला उशीर झाला तर मीच घाबरतो कारण, कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो लहानपणापासून ऐकत आलो आहे बात कायद्याचा म्हणे भारी लांब असतो हात पण हा हात कायदा मोडणाऱ्यांना कधी धरतो? कारण, कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो









