logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
घर
ऑक्टोबर 16, 2015
जगपंचायत
ऑक्टोबर 24, 2020
अशीच एक इमारत
सप्टेंबर 2, 2016
खुल्या अर्थव्यवस्थेमुळे नव्या पिढीकरता कारकिर्दीची अनेक दालनं उघडत आहेत. शिक्षण आणि नोकऱ्यांचे सरधोपट मार्ग बदलत चालले आहेत. हे नवीन मार्ग निवडण्याकरता घरापासून दूर जाणं हे आता अपवादात्मक राहिलेलं नाही. एक किंवा दोनच मुलं आणि तीही परगावी / परदेशी स्थायिक होणं हे अनेक मध्यमवर्गीय घरांचं आजचं वास्तव आहे. अशा घरांनी बनलेली ही अशीच एक इमारत . . .

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/0zKQHfoncWs ह्या ठिकाणी ऐकता येईल.

चाकरमान्यांनी उपनगरात घर म्हणून वसवलेली वसाहत
अशीच एक इमारत || धृ ||

भारतीय अर्थव्यवस्थेला लागलेले परवान्यांचे ग्रहण सुटले
आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षांना पंख फुटले
सरकारी नोकरीत ष्टांपासारखं चिकटणं झालं बंद
खासगी क्षेत्राच्या दुप्पट पगाराचा लागला मध्यमवर्गीयांना छंद
दोघांच्या मिळकतीने उभे राहिले स्वतंत्र संसार
बँका होत्याच उचलायला नवीन घराचा आर्थिक भार

वीस कुटुंबं आली जिथे आपलं राहणीमान सुधारत
अशीच एक इमारत || १ ||

सुखवस्तू तरूण जोडपी आणि उत्साह सळसळता
ती इमारतही एकरूप झाली त्यांच्या आयुष्यांची वळणं वळता
कधी कुणी बघत असे कुणाकडे नजर तिरकी करून
मात्र सारेच राहिले मध्यमवर्गाची मूल्यं धरून
कॉलेजचे दिवस स्मरून साजरे होत होते सण समारंभ
घट्ट मैत्री व्हायला लागला नाही विलंब

घराचं देखणं चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर होती चितारत
अशीच एक इमारत || २ ||

कुणाचं पहिलं कुणाचं दुसरं अपत्य तिथेच जन्माला आलं
बघता बघता इमारतीचं गोपाळवन झालं
मित्र मैत्रीणी दंगा मस्ती शाळा खेळ सण
तिथे कुणालाच कधी वाटलं नाही एकटेपण
कुणी चित्रकला कुणी संगीत तर कुणी शिकत होतं नाच
प्रत्येक इयत्तेत मुलं होती निदान पाच

सुट्टीच्या दिवसांत जिथे सकाळ संध्याकाळ सारे होते उंडारत
अशीच एक इमारत || ३ ||

दहावी बारावी पदवी करत मुलं हाताशी आली
ती मूळची तरूण जोडपीही आता पोक्त झाली
नवीन पिढीच्या पंखांत आता उसळत होती वीज
खुणावत होतं त्यांना रोज एक नवं क्षितीज
किती दिवस त्या इमारतीच्या भिंती त्यांना ठेवणार होत्या धरून
एक एक करत सारी पिल्लं घरट्यांतून गेली उडून

उभी होती त्यांच्या बालपणीच्या स्मॄती गोंजारत
अशीच एक इमारत || ४ ||

इमारतीतील रहिवासी आता वार्धक्याने झुकले
मॄत्यूमुळे काही आपल्या जोडीदारास मुकले
समारंभांतील उत्साह जाऊन राहिला केवळ उपचार
मुळात समारंभांना आता रहिवासी जमतच नाहीत फार
पेन्शनरांच्या कट्ट्यावर हल्ली होतात कधी विनोद नर्म
एकमेकांना सांभाळून आहेत पाळत शेजारधर्म

उभी आहे पुढे काय होणार ह्मा विचाराने शहारत
अशीच एक इमारत || ५ ||

नवीन काही कुटुंबं आली पण आता राहिलं नाही पूर्वीसारखं
नवीन कुटुंबं असतात आपली आपल्यातच गर्क
दिवेलागण होण्यापूर्वीच आता राहत नाही जाग
तशीच टुमदार आहे तरीही कोमेजलेली वाटते बाग
जाब विचारण्याकरता आता तिथे येत नाही कुणाची आर्इ
कारण मुलं नसलेल्या त्या बागेत आता भांडणच होत नाही

उभी आहे न परतणाऱ्या अपत्यांच्या आठवणी रहिवाशांसोबत कुरवाळत
अशीच एक इमारत || ६ ||

चाकरमान्यांनी उपनगरात घर म्हणून वसवलेली वसाहत
अशीच एक इमारत || धृ ||

शेअर करा
75

आणखी असेच काही...

ऑक्टोबर 24, 2020

जगपंचायत


पुढे वाचा...
ऑक्टोबर 16, 2015

घर


पुढे वाचा...
जून 6, 2014

इस्पितळाची वारी


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो