logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
लाडकी
जून 17, 2012
अर्थ
ऑक्टोबर 19, 2012
मित्र एक चांगला
ऑगस्ट 3, 2012
आंतरराष्ट्रीय मैत्रीदिन ५ ऑगस्ट रोजी (ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार) साजरा होत आहे. त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रक्ताच्या नात्यांच्या मर्यादा जिथे स्पष्ट होतात तिथून मैत्रीच्या नात्याची सुरुवात होते. मैत्रीकरता सामाजिक किंवा आर्थिक पत, वय, लिंग असे भेद आड येत नाहीत. आजच्या इंटरनेटच्या जमान्यात तर भौगोलिक अंतरही मैत्रीच्या आड येत नाही. अशाच माझ्या कैक योजनं दूर पसरलेल्या मित्रमंडळाला ही कविता समर्पित.

शाळेमध्ये अपूर्ण आहे गॄहपाठाची वही
प्रगतीपुस्तकावरी विसरलो जरी वडिलांची सही
आर्इवडिलांची मदत मागण्या नाही काही अर्थही

उरला सुरला धीर कुडीतून तुमच्या जर पांगला
वही सहीच्यासाठी असावा मित्र एक चांगला || १ ||

तुम्ही तिच्यावर मरता ठाऊक होते हे गावाला
प्रसंग आला बाका जेव्हा कळे तिच्या भावाला
तुमचा भाऊ बहीण तयांची मदत फक्त नावाला

मिलन मनांचे व्हावे ज्याने चंगं असा बांधला
प्रेमभंग कथण्यास असावा मित्र एक चांगला || २ ||

गॄहस्थाश्रम नित्य नव्या खर्चांनी करी बेजार
नव्या नव्या गरजा उद्भवती नवे नवे आजार
अपत्य पडती कमी समजण्या चिंता तुझ्या हजार

मदत नाही पण व्यथा ऐकण्या सवे तुझ्या थांबला
विरंगुळा देण्यास असावा मित्र एक चांगला || ३ ||

वार्धक्याने सुरू जाहली शारीरिक कुरबुर
सायंकाळी आयुष्याच्या अनामिक हुरहूर
आपुले मन गोंजारत राही पत्नी मनाने दूर

तुझे रंजणे ऐकून तरीही जो न कधी गांजला
मरणाला हसण्यास असावा मित्र एक चांगला || ४ ||

नातलगांची तुझ्या भोवती नसे कधी कमतरता
दाम अपेक्षांचे मोजावे लागे नात्यांकरता
कोणाचे मन कधी दुखावे सतत असे शक्यता

मतभेदांना मनात ठेवून जो न कधी भांडला
नात्यांच्या पलीकडे असावा मित्र एक चांगला || ५ ||

शेअर करा
2

आणखी असेच काही...

मार्च 8, 2022

पुरुषप्रश्न


पुढे वाचा...
ऑगस्ट 1, 2021

जेवण


पुढे वाचा...
मार्च 21, 2021

कवीराज


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023
  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो