logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
मित्र एक चांगला
ऑगस्ट 3, 2012
स्वामी विवेकानंद
जानेवारी 18, 2013
अर्थ
ऑक्टोबर 19, 2012
अपेक्षा नसताना अबाध्य राहते ती खरी मैत्री … परिस्थिती कितीही निराशाजनक असली तरी कसोटीला उतरते ती खरी मैत्री … आणि जगाच्या दृष्टीने निरर्थक कृत्याला केवळ आपल्या वैयक्तिक निकषांवर अर्थपूर्ण बनवते ती खरी मैत्री! अशा खऱ्या मैत्रीची परिमाणं मृत्यू नजीक असताना खऱ्या अर्थाने जगासमोर येतात …

बलाढ्य होता शत्रू त्याची शस्त्रे होती भारी
तीन दिवस तरी तसाच आम्ही लढा ठेविला जारी
वरूनी ये आदेश शत्रूला तीन दिवस तरी रोखा
होतो थोडे तरीही शत्रुला दिला नाही मोका

केली माझ्या तुकडीने अन् पराक्रमाची शर्थ
दिवस तीन होता युद्धाला उरला नव्हता अर्थ || १ ||

हाती लागे ते ते घेऊन आम्ही काढला पळ
गाठण्यास अन् फिरलो मागे सुरक्षित तो तळ
एक जवान सांगतो जेव्हा दिन येतसे सरत
दोस्त राहिला मागे जातो आणावयास परत

मन माझे आले दाटुनिया पाहून तो निस्वार्थ
पण मॄत्यूच्या तोंडी जाण्या उरला नव्हता अर्थ || २ ||

वदलो त्याला धोका किती ती तुजला आहे जाण
मित्राचेही नक्कीच तुझिया गेले असतील प्राण
ऐकण्यास तो तयार नव्हता भरूनी आला गळा
वदत राहिला एकच जाणे भागच आहे मला

जाऊनी अंती दिले बोलणे ऐकत नव्हता सार्थ
भावनांसवे वाद घालण्या उरला नव्हता अर्थ || ३ ||

फार समय लोटला पडावी मध्यरात्रही झाली
चिंतेने अन् त्याच्या आमुचा जीव होर्इ वरखाली
चालत येणारी ती छबी मग आम्हां लागली दिसू
खांद्यावरती ओझे ओठांवरती होते हसू

ठेवताच ते ओझे कळुनी आला मला अनर्थ
अचेत शरीरा उपचारातही उरला नव्हता अर्थ || ४ ||

त्यास म्हणे मी धोका घेऊन केलीस मोठी चूक
वाचविण्याची मित्राला आशा होती अंधुक
मला म्हणाला आधी तुम्ही पण ऐका पूर्ण कहाणी
सांगा मजला चूक असे का जाणे माझे रानी

मला विचारा सांगिन जाणे नव्हते माझे व्यर्थ
वाटत होते जरी मलाही उरला नव्हता अर्थ || ५ ||

दिसे मला तो प्राण कुडीतून सोडून नव्हते गेले
पाहून मजला येताना अन् ओठ तयाचे हलले
मला म्हणाला झुंजत होतो मॄत्यूशी ह्मा रात्री
येशील फिरूनी माझ्याकरता होती मजला खात्री

बोलून इतुके हमसाहमशी रडू लागला आर्त
सांत्वनभरल्या शब्दांनाही उरला नव्हता अर्थ || ६ ||

शेअर करा
3

आणखी असेच काही...

मार्च 8, 2022

पुरुषप्रश्न


पुढे वाचा...
ऑगस्ट 1, 2021

जेवण


पुढे वाचा...
मार्च 21, 2021

कवीराज


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो