विद्ध
जानेवारी 3, 2022भारत रत्न सी सुब्रमण्यम
जानेवारी 18, 2022भारत रत्न मालिका
कोणत्याही देशाची ओळख त्या देशातील माणसांमुळे होते. मात्र त्या माणसांपैकी काही नररत्नं त्या देशाला महान बनवतात. आधुनिक भारताच्या सामाजिक आणि वैचारिक जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या अशाच काही कर्तृत्ववान व्यक्तींची पारख करून त्यांना स्वतंत्र भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारत रत्न’ देऊन सन्मानित केलं जातं. आपल्याला अभिमान वाटावा अशा ह्या भारतरत्नांची थोडक्यात ओळख करून देणारी ही भारत रत्न मालिका …‘भारत रत्न मालिका’ यूट्यूबवर https://youtu.be/0lp1uH29VCA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
संकटांतूनी उठली
कार्यंही केली नेक
देशासाठी झटली
अपत्यं ती कित्येक
जराही नाही कमी
आदर भाव मनात
स्वतंत्र भारत नेहमी
त्यांच्या राही ऋणात
भारतवर्षासाठी ज्यांचे योगदान अपार
कृतज्ञतेने देती भारत रत्न पुरस्कार ॥