logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
हरीचरण शरण
फेब्रुवारी 6, 2015
देव असावा कसा
जुलै 18, 2014
‘देव कुणाला म्हणावे अथवा म्हणू नये’ असा एक नवीनच वाद सध्या सुरु आहे. मला इतके दिवस वाटत होतं की देव हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. एखादी गोष्ट देव आहे किंवा नाही हे ठरवणारी एखादी संस्था आहे हेच मला ठाऊक नव्हतं. आमच्या office मध्ये दसऱ्याला phone आणि संगणकांचीही पूजा होते. त्याकरता परवानगी घेतली आहे का हे तपासलं पाहिजे . . .

देव असावा असा सूर्यकिरण सोनेरी
दिवसाच्या आरंभी उमेद मनी जो पेरी || १ ||

देव असावा असा नितळ काच आरसा
माझ्यातील तेजाचा दावी मला कवडसा || २ ||

देव असावा असा सकाळची न्याहारी
दिनभरच्या कामाची मिळेल उर्जा सारी || ३ ||

देव असावा असा जशी वाट ती लांब
मार्गी त्या लागता कुणी न म्हणते थांब || ४ ||

देव असावा असा आसमंत ते निळे
जगी कुठेही जावे त्याचे छप्पर मिळे || ५ ||

देव असावा असा पक्वान्नाचे ताट
पाहून भरते पोट नको बसाया पाट || ६ ||

देव असावा असा वार्‍याची जणू झुळूक
उष्ण मनातील जागा करतो शांत अचूक || ७ ||

देव असावा असा मोठी जशी बहीण
रडू आपुले ऐकाया येर्इ न तिजला शीण || ८ ||

देव असावा असा जसा जवळचा सखा
धावून ये मदतीला अपाय झाला नखा || ९ ||

देव असावा असा जसा मुलीचा पिता
खंबीर मनी ओलावा कधी न होर्इ रिता || १० ||

देव असावा असा कपाशीचे ते वस्त्र
शोषून घेर्इल माझ्या विपदा जो सहस्र || ११ ||

देव असावा असा आजीची ती गोष्ट
निजता निजता ऐसे विसरूनी जाती कष्ट || १२ ||

देव असावा असा रातीचा कंदील
काळोखाची भीती त्याचमुळे जार्इल || १३ ||

शेअर करा
48

आणखी असेच काही...

मे 23, 2022

देव


पुढे वाचा...
एप्रिल 6, 2019

सणावली


पुढे वाचा...
फेब्रुवारी 6, 2015

हरीचरण शरण


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो