logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
प्रतिज्ञा
ऑगस्ट 14, 2021
सणावली
नोव्हेंबर 28, 2021
बेडकांची शाळा
नोव्हेंबर 14, 2021
आज चाचा नेहरूंचा वाढदिवस. छोट्या आणि पोक्तपणाचा आव आणणाऱ्या मोठ्यांच्या मनात दडलेल्या अश्या दोन्ही बच्चाकंपनींना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आजच्या दिवसाकरता हे खास बालकाव्य. तुम्हीही ऐका आणि छोट्यांनाही ऐकवा …

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/LA3sNV73wMI ह्या ठिकाणी ऐकता येईल.

बेडकांची शाळा
तिथे कावळा आला काळा
म्हणतो शिकवीन तुम्हाला
तो एकच माझा चाळा ॥ १ ॥

बेडूक म्हणती वाहव्वा खास
घे भूगोलाचा तू तास
कावळा म्हणाला चालेल
शिकवू लागला इतिहास ॥ २ ॥

गणिताची आली वेळ
कावळ्याचे न्यारे खेळ
बेरिज वजाबाकीची
तो करतो सारी भेळ ॥ ३ ॥

कावळा शिकवी मग भाषा
गोष्टी सांगे तो खाशा
बेडूक नाचती सारे
आणि कावळा वाजवी ताशा ॥ ४ ॥

काहीतरी पण घडले
बेडकांना नाही कळले
वर्गातील बाकांवरचे
कित्येक बेडूक गळले ॥ ५ ॥

झाले खाऊन खाऊन लठ्ठ
बेडूक होते ते मठ्ठ
बोलावून एकेकाला
तो कावळा करतो गट्ट ॥ ६ ॥

बेडकांची शाळा
तिथे उरला कावळा काळा
आता म्हणतो येथे मी
काढीन उंदरांची शाळा ॥ ७ ॥

बेडकांची शाळा
झाली उंदरांची शाळा
बेडकांची शाळा
झाली उंदरांची शाळा ॥ ८ ॥

शेअर करा
4

आणखी असेच काही...

डिसेंबर 18, 2022

… अडलं नाही बुवा


पुढे वाचा...
नोव्हेंबर 25, 2022

छेड


पुढे वाचा...
मे 23, 2022

देव


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022
  • छेड नोव्हेंबर 25, 2022
  • देव मे 23, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो