नाव
मार्च 31, 2018साबरमतीचा संत
ऑक्टोबर 2, 2018बाप्पांचे पर्यावरण
उद्या येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! फार मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या ह्या उत्सवामुळे पर्यावरणाबद्दल चिंता वाटणं साहजिक आहे. काही दिवसांपूर्वी एका शाळेतील मुलांकरता गणपती दरम्यान आणि एरवीही पर्यावरणाची काळजी कशी घेता येईल ह्याबद्दल एक आरती लिहून देण्याची संधी मिळाली. ती आरती सादर करत आहे…
जय देव जय देव जय मंगलमुर्ती
प्रदूषणाने त्रासली धरती
जय देव जय देव ॥
POPची मूर्ती हवी कशाला
शाडूच्या मूर्तीत आणू तुम्हाला
Thermocolचे मखर नको आम्हाला
Plastic Nylon सर्वांनी टाळा
जय देव जय देव ॥
झांजा टाळ्यांसवे घंटीचा नाद
गाऊ आरत्या नैवेद्याचे ताट
लाउडस्पीकर नको नको ती गाणी
नको आम्हाला तो दणदणाट
जय देव जय देव ॥
टाकणार नाही ताटात पोळ्या
आवरून ठेवू आमुच्या खोल्या
बघाल फरक आपुल्या डोळ्या
निर्माल्येही टाकू कचऱ्यात ओल्या
जय देव जय देव ॥
नको तेव्हा दिवे पंखे मालवू
नळ सारे बंद करून ठेवू
वाहनांचा अतिरेक नेहेमी टाळू
चालण्याची सवय लावून घेऊ
जय देव जय देव ॥
बाप्पा घेतो आज शपथ तुझी
पर्यावरणाची घेऊ काळजी
घरच्या सर्वांनाही करून राजी
संपादन करू तुमची मर्जी
जय देव जय देव ॥
जय देव जय देव जय मंगलमुर्ती
प्रदूषणाने त्रासली धरती
जय देव जय देव ॥