logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
चांगलं तेवढं घ्यावं
जानेवारी 20, 2022
पुरुषप्रश्न
मार्च 8, 2022
प्रेमात पडल्यावर काय होतं
फेब्रुवारी 14, 2022
आज पाश्चात्य देशांत प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो. तसं बघायला गेलं तर प्रेमाच्या उत्सवाला दिवस कशाला हवा? माणूस कधीही, कुठेही आणि कोणाच्याही प्रेमात ‘पडू’ शकतो. प्रेमात पडलेल्या माणसांची काही विशिष्ट लक्षणं असतात. पण इतरांमध्ये ही लक्षणं शोधण्यापूर्वी एकदा विचार करा. कदाचित इतरांना तुमच्यात ही लक्षणं दिसत नसतील ना?

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/Tkph0SenzzY ह्या ठिकाणी ऐकता येईल.

प्रेमात पडल्यावर काय होतं ?

प्रेमात पडल्यावर माणूस होतो आशावान
कधीतरी घायाळ करेल तिच्या नजरेचा बाण
मी वाटेतून जाताना तिची हाक येईल ऐकू
त्या तिच्या हाकेकडे त्याचा सतत असतो कान ॥

प्रेमात पडल्यावर काय होतं ?

प्रेमात पडल्यावर माणसाचं होतं गाढव
कधी केस तर कधी दाढी वाढव
समजतच नाही मित्र काय बोलतायत ते
आणि समजलं तर सुरू होतं त्याचं अकांडतांडव ॥

प्रेमात पडल्यावर काय होतं ?

प्रेमात पडल्यावर माणूस होतो आंधळा
फडतुस चित्रपटांना रडतो काढून गळा
भिंतीकडे पाहात गाऊ लागतो गाणी
माझ्या पिरतीचं पाणी आणि तुझा ज्वानीचा मळा ॥

प्रेमात पडल्यावर काय होतं ?

प्रेमात पडल्यावर माणूस होतो मुका
पुस्तकाच्या एकाच पानाकडे बघत बसतो फुका
काहीही विचारलं तर तोंडातून शब्द फुटत नाही
अभ्यासात आणि ऑफिसच्या कामात करू लागतो चुका ॥

प्रेमात पडल्यावर काय होतं ?

प्रेमात पडल्यावर माणूस होतो बहिरा
फरक पडत नाही मागे लावा कितीही ससेमिरा
मूर्ख हास्य तोंडावर ठेवून बसतो
मग भले त्याला मारा किंवा उभा चिरा ॥

प्रेमात पडल्यावर काय होतं ?

प्रेमात पडल्यावर माणसाचा होतो महानायक
शक्य वाटू लागतात भलत्याच गोष्टी अचानक
पंधरा गुंड समोर आले तरी बेहत्तर
आणि त्यातला प्रत्येक गुंड असो कितीही भयानक ॥

प्रेमात पडल्यावर काय होतं ?

प्रेमात पडल्यावर माणूस होतो खर्चिक
महिन्याभरात संपतं बजेट त्याचं वार्षिक
दुकानं होतात बंद आणि मित्र लागतात टाळू
कोसळतं त्याच्यावर घोर संकट आर्थिक ॥

प्रेमात पडल्यावर काय होतं ?

प्रेमात पडल्यावर माणसाचं होतं कल्याण
दु:ख वेदना ह्यांचं विसरलं जातं भान
चिंचेच्या झाडाचा होतो चिनार वृक्ष
आणि बसस्टॉप वाटू लागतो रम्य परीसर छान ॥

प्रेमात पडल्यावर काय होतं ?

प्रेमात पडल्यावरच पण माणूस येतो माणसात
जगण्याचा अर्थ सापडतो त्याला निमिषार्धात
आजूबाजूचे लोक त्याला चिडवू द्यात भले
पण प्रत्येकाला आपल्या प्रेमाचे दिवस आठवू लागतात ॥

शेअर करा
5

आणखी असेच काही...

डिसेंबर 18, 2022

… अडलं नाही बुवा


पुढे वाचा...
नोव्हेंबर 25, 2022

छेड


पुढे वाचा...
मे 23, 2022

देव


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022
  • छेड नोव्हेंबर 25, 2022
  • देव मे 23, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो