logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
जेवण
ऑगस्ट 1, 2021
बेडकांची शाळा
नोव्हेंबर 14, 2021
प्रतिज्ञा
ऑगस्ट 14, 2021
‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे …’ आपल्यापैकी प्रत्येकाने शाळेत असताना ही प्रतिज्ञा म्हटलेली आहे. धर्म, जात, प्रांत, भाषा असल्या भेदभावांच्या पलीकडे जाऊन एक देश म्हणून एकत्र येण्याचा संदेश ही प्रतिज्ञा देते. आज पंचाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रत्येक भारतीयाने ही प्रतिज्ञा पुन्हा एकदा करण्याची वेळ आली आहे. केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर त्यामागील अर्थ समजून घेऊन …

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/VAVE5ntF3FM ह्या ठिकाणी ऐकता येईल.

इतिहासाने घालून दिलेली पृथ्वीवरील वेस आहे
श्वासाइतकं सत्य आहे भारत माझा देश आहे ॥

भिन्न धर्म जात पंथ असती प्रत्येकाचे अपुले अपुले
तरीही सारे बंधू, भगिनीच – भारत शब्दच श्लेष आहे ॥

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी म्हणतो
प्रेम आहे ह्या देशावरती हाच तो संदेश आहे ॥

विविध वर्ण विविध भाषा आणि सणही नटले वैविध्याने
अभिमान समृद्ध परंपरेचा वेगवेगळा जरी वेष आहे ॥

पालक गुरुजन वडिलधारे ह्यांचा मान ठेवीन नक्की
प्रत्येकाशी सौजन्याने वागेन हा शिरसावंद्य आदेश आहे ॥

देश आणि देशबांधवांशी निष्ठा हीच माझी प्रतिज्ञा
त्यांचे कल्याण आणि समृद्धी ह्यातच माझ्या सौख्याचा समावेश आहे ॥

लहानपणी आपण प्रत्येकाने ही प्रतिज्ञा म्हटली होती
आता मात्र शब्दांबरोबर त्यातील भावनाही नामशेष आहे ॥

माझे धर्म भाषा प्रांत त्याचे धर्म भाषा प्रांत
माझ्या देशातील बांधवांमध्येही आता सख्खे सावत्र अशी रेष आहे ॥

येईल का तो सुदिन जेव्हा सारे भारतीय बांधव होतील
आणि म्हणतील विविधतेत एकता म्हणूनच माझा देश विशेष आहे ॥

इतिहासाने घालून दिलेली पृथ्वीवरील वेस आहे
श्वासाइतकं सत्य आहे भारत माझा देश आहे ॥

शेअर करा
5

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो