मोहर्रम
डिसेंबर 17, 2021गोकुळाष्टमी
डिसेंबर 17, 2021नारळी पौर्णिमा / रक्षाबंधन
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/s2Vs6nDReNU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
पूजा सागराची करण्याला श्रावण पूनम रात
नारळ अर्पण सागरास कोळ्यांची गीते गात
धार तुपाची सोडून खाती सर्व नारळी भात
नारळी पौर्णिमेचा सण हो असाच तो साजरा ॥
आज बांधते बहिण भावास पवित्र धागा राखी
स्मरून राखीला द्रौपदीसवे श्रीकृष्ण उभा ठाकी
विष्णूकरिता लक्ष्मी बळीराजाची करूणा भाकी
नारळी पौर्णिमेचा सण हो असाच तो साजरा ॥