logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
कोजागिरी पौर्णिमा
डिसेंबर 17, 2021
कार्तिकी एकादशी / तुलसी विवाह
डिसेंबर 17, 2021
दिवाळी
डिसेंबर 17, 2021
सणांचा राजा दिवाळीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/F3aXAoDJszg ह्या ठिकाणी ऐकता येईल.

अश्विन मास संपता रघुवर वनवासाहून आले
अभूतपूर्व स्वागत मग त्यांचे अयोध्येमध्ये झाले
दीप प्रज्वलन करूनी सारे नगरच उजळूनी गेले
पाच दिवस अन् दिवाळीचा सण मग होई साजरा ॥

असे सुट्टी शाळेस आणखी गोड थंडीचा काळ
चकली चिवडा लाडू आणिक करंजीचा फराळ
कंदील पणत्या रांगोळी अन् फटाक्यांचा उजाळ
पाच दिवस मग दिवाळीचा सण असा होई साजरा ॥

अश्विन शुद्ध त्रयोदशीला धनलक्ष्मी ये दारी
उत्साहाने दिवे लावूनी पूजा करी व्यापारी
धन्वंतरीची पूजा आरोग्य मागती नर-नारी
पहिल्या दिवशी दिवाळीचा सण असा होई साजरा ॥

अभ्यंगस्नान करण्यास नरक चतुर्दशीला उठणे
राजेशाही स्नान कराया तेल सुगंधी उटणे
नरकसुराच्या नि:पाताला चिरटफळाचे फुटणे
दुसऱ्या दिवशी दिवाळीचा सण असा होई साजरा ॥

अश्विन मासी अमावस्येस होते लक्ष्मी पूजन
लक्ष्मी आणि गणपतीस ह्या दिनी पूजती जन
बत्तासे लाह्या नैवेद्यी वाढे तुमजे धन
तिसऱ्या दिवशी दिवाळीचा सण असा होई साजरा ॥

कार्तिक शुद्ध प्रतिपदा बळीला वामन ये आडवा
ह्याच दिवशी जन सकल पाळती दिवाळीचा पाडवा
पत्नीस भेटवस्तू देऊनिया प्रेमयोग वाढवा
चतुर्थ दिवशी दिवाळीचा सण असा होई साजरा ॥

भाऊबीजेच्या दिवशी मॄत्यू वैकुंठाची हमी
कारण ह्या दिनी बंधू यमाचे अतिथ्य करते यमी
बंधू घेती काळजी भगिनीस पडो ना काही कमी
पंचम दिवशी दिवाळीचा सण असा होई साजरा ॥

शेअर करा
0

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो