logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
पाचावर धारण
मे 1, 2020
माया
जून 5, 2020
जन्मठेप
मे 15, 2020
आंतरराष्ट्रीय कुटुंबदिनाच्या शुभेच्छा! कुटुंब ह्या संस्थेला ह्या टाळेबंदीच्या काळात एक वेगळाच आयाम प्राप्त झाला आहे. इतका की अनेकांना (विशेषतः पुरुषांना) त्याचा कंटाळा येऊ लागला आहे. ‘कोई लौटा दे मेरे बीते हुवे दिन’ असं म्हणत संध्याकाळी खिडकीतून बाहेर बघत बसणारे पुरुष आता अनेक घरांत (घरांच्या खिडक्यांत) दिसून येत आहेत…

व्हरांड्यात उभा होतो न्याहाळत रात्रीचा देखावा तो रम्य
मनात उठलं होतं आठवणींचं काहूर अदम्य ॥

ढगांच्या मागून डोकावण्याचा चंद्राला लागला होता जणू छंद
शरीराला सुखावत होता शीतल वारा झुळझुळता मंद ॥

माझ्या शेजारी उभी राहून तीही डोळ्यांनीच पीत होती पौर्णिमेची ती रात
कसला विचार करतोयस एवढा मला म्हणाली घेऊन हातात माझा हात ॥

म्हटलं आठवतंय असाच उगवला होता त्याही दिवशी पौर्णिमेचा चांद
आणि भावना झाल्या होत्या अनावर भेदून मनाचे बांध ॥

बिलगून मला म्हणाली वाटलं होतं विसरला असशील तू बहुदा
थोडीथोडकी नाहीत त्या गोष्टीला झाली आहेत वर्षं चांगली चौदा ॥

म्हटलं सखे, कोरली आहे ती रात्र माझ्या मनात अगदी करकरीत कोरी
पकडली होती तुझ्या वडिलांनी ज्या रात्री आपल्या भेटीगाठींची चोरी ॥

काही केल्या तयार नव्हते माझी धरलेली मानगूट सोडायला
म्हणाले लग्न कर हिच्याशी नाहीतर पाठवतो तुरूंगात खडी फोडायला ॥

खळखळून हसत ती आणखीन बिलगली मला तरी माझा चेहरा गंभीर
कधीपासून बोलायचं होतं ते बोलून गेलो जरी आता झाला होता उशीर ॥

तेव्हाच नीट विचार केला असता तर असा फसलो नसतो गं
चौदा वर्षं झाली बरोब्बर आज जन्मठेपेतून सुटलो असतो गं ॥

शेअर करा
9

आणखी असेच काही...

मार्च 26, 2023

मोकळा वेळ


पुढे वाचा...
मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो