logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
सरनौबत
मे 5, 2019
गुर
जुलै 1, 2019
… गोष्टी काही काही
मे 21, 2019
आज जागतिक सांस्कृतिक विविधता दिन आहे. सांस्कृतिक विविधता जशी भौगोलिक अंतराप्रमाणे वाढत जाते तशीच पिढ्यांमधील अंतरामुळेही वाढत जाते. एकाच समाजातील दोन पिढ्यांचा सांस्कृतिक बाज निराळा असू शकतो. तंत्रज्ञानामुळे भौगोलिक अंतरं कमी होत असताना निरनिराळ्या समाजांतील सांस्कृतिक विविधतेतही अनेक समान दुवे सापडत आहेत. त्याचप्रमाणे दोन पिढ्यांतील अंतर मिटवण्याकरताही अनेक समान दुवे सापडतील. कारण, जग कितीही बदललं तरी बदलत नाहीत… गोष्टी काही काही…

जगामध्ये सतत दिसते नव्याची नवलाई
पण बदलत नाहीत पिढ्यान् पिढ्या गोष्टी काही काही ॥ धृ ॥

पूर्वी एस्टीने जाताना आकाशातील विमान पाहून मुलं होत असत आनंदी
आता विमानातून खाली बघण्याची बरेचदा मिळते संधी
मात्र लांबचा प्रवास म्हंटला की मुलांचं मन कसं उचंबळून जाई
बदलत नाहीत पिढ्यान् पिढ्या गोष्टी काही काही ॥ १ ॥

पूर्वी मुलांनी शिक्षणात चमकावं म्हणून अभ्यासाचा धोशा लागायचा रोज
हल्ली पालक म्हणतात मुलांनी जिंकावेत रियालिटी शोज
मात्र अपत्याचं यश पाहून अजूनही देवापुढे साखर ठेवते त्याची आई
बदलत नाहीत पिढ्यान् पिढ्या गोष्टी काही काही ॥ २ ॥

पूर्वी ग्रॅजुएट झालं की वाटायचं आला दोन बोटांवर स्वर्ग
हल्ली डबल ग्रॅजुएट मुलांचीही वाट पाहत असतो पुढल्या कोर्सचा वर्ग
मात्र शिक्षणाचा प्रसार झाला तरी बेकारी दिसते ठायी ठायी
बदलत नाहीत पिढ्यान् पिढ्या गोष्टी काही काही ॥ ३ ॥

पूर्वी खिसा किंवा पुस्तक तिचा फोटो ठेवायला जागा फक्त दोन
हल्ली तिच्या चेहेऱ्याचा वॉलपेपर मिरवत असतो मोबाईल फोन
मात्र तिला प्रत्यक्षात बघितल्यावर हृदयाची धडधड तशीच राही
बदलत नाहीत पिढ्यान् पिढ्या गोष्टी काही काही ॥ ४ ॥

पूर्वी गावस्कर बॅटिंगला आला की चिकटून राहायचा रेडिओला कान
हल्ली विराट बॅटिंगला आला की टीवीसमोरून हलायचं विसरून जातो भान
मात्र शतक हुकलं कोणाचं तर तेवढीच खंत वाटते आताही
बदलत नाहीत पिढ्यान् पिढ्या गोष्टी काही काही ॥ ५ ॥

पूर्वी चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं जर आला नाही सकाळचा पेपर
हल्ली चुकल्या चुकल्यासारखं वाटतं टीवीचा हरवला रिमोट जर
मात्र बातम्या समजून घेण्याकरता अजूनही तशीच असते घाई
बदलत नाहीत पिढ्यान् पिढ्या गोष्टी काही काही ॥ ६ ॥

पूर्वी स्त्रीमुक्तीचा लढा चालू होता स्त्रीयांच्या शोषणाविरूद्ध
हल्ली स्त्रीमुक्तीचा लढा चालू आहे स्त्रीयांच्या शोषणाविरूद्ध
मात्र पुरूष अजूनही स्वत:ला मालक समजतो आणि गुलाम ठरते बाई
बदलत नाहीत पिढ्यान् पिढ्या गोष्टी काही काही ॥ ७ ॥

पूर्वी राजकारणी आणि नोकरशाहीतील मंडळी लाखो रूपये खात
हल्ली राजकारणी आणि नोकरशाहीतील मंडळी करत नाहीत करोडोंच्या खाली बात
मात्र जनता आपली पीठ दळते आणि जो तो जनतेचाच पैसा खाई
बदलत नाहीत पिढ्यान् पिढ्या गोष्टी काही काही ॥ ८ ॥

जगामध्ये सतत दिसते नव्याची नवलाई
पण बदलत नाहीत पिढ्यान् पिढ्या गोष्टी काही काही ॥ धृ ॥

शेअर करा
6

आणखी असेच काही...

मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा


पुढे वाचा...
डिसेंबर 18, 2022

… अडलं नाही बुवा


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023
  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो