logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
दुःख
ऑक्टोबर 18, 2013
अंधश्रद्धा
डिसेंबर 20, 2013
बूट
डिसेंबर 6, 2013
कोणत्याही स्पर्धेत उतरणारा प्रत्येक स्पर्धक पहिला क्रमांक मिळवण्याकरता तयारी करत असतो. मात्र पहिला क्रमांक येणार हे नक्की असताना जर कोणी दुसऱ्या क्रमांकावर येण्याकरता धडपडत असेल तर? कधीतरी माझ्या वाचनात आलेल्या कथेवर आधारित ही माझी काव्यकथा . . .

एकच गोष्ट बसली होती
ज्याच्या त्याच्या ओठी
गावात भरणार होती आमच्या
जत्रा सर्वात मोठी

माझ्या उत्साहाला नव्हता
सारा गाव पुरत
कारण जत्रेत होणार होती
धावण्याची शर्यत

पहिला मीच येणार गावचा विश्वास माझ्यावर
मला खरंच यायचं होतं दुसर्‍या नंबरावर || १ ||

ऐकून वाटेल तुम्हाला ही
आश्चर्याची गोष्ट
सांगतो काय ते ऐकाल जर
तर सारं होर्इल स्पष्ट

स्पर्धेसाठी ठेवली होती
बक्षिसांची लूट
पण दुसर्‍या नंबराकरता बक्षीस
ठेवलं होतं बूट

करंडक आणि पैसे होते पहिल्या नंबरावर
मला खरंच यायचं होतं दुसर्‍या नंबरावर || २ ||

दोन वर्षांनी असे मिळायचे
एकदाच मला बूट
परवडणारी नव्हती आम्हा
असल्या नियमात सूट

शाळेमधल्या शर्यतीत
भाग घेऊन पाहिला
बूट माझे फाटले पण
नंबर आला पहिला

वडिलांनी मग चोपलं मला नेऊन पारावर
मला खरंच यायचं होतं दुसर्‍या नंबरावर || ३ ||

तार्इने बघितले माझे
फाटके बूट काल
मला म्हणाली शर्यतीला
माझे बूट घाल

बूट परत मिळणार नव्हते
तिला पर्वा नाही
आर्इ नव्हती मला माझी
तार्इच माझी आर्इ

फाटणार होते बूट शर्यत होती माळावर
मला खरंच यायचं होतं दुसर्‍या नंबरावर || ४ ||

पाहता पाहता वाट उजाडला
शर्यतीचा दिवस
माझ्या विजयासाठी तार्इ
बोलली होती नवस

शर्यत सुरू झाली माझा
सोडला नव्हता हेका
पुढे धावणार्‍यास म्हणालो
जिंक शर्यत लेका

निम्मी शर्यत संपली तरी मी दुसर्‍या नंबरावर
मला खरंच यायचं होतं दुसर्‍या नंबरावर || ५ ||

निम्म्या अंतरावर लावलेला
बावटा मी गाठला
खड्ड्यात माझा पाय गेला
आणि बूट फाटला

बूट होता तार्इचा तो
डोळे भरून आले
माझ्यामागचे स्पर्धक मला
ओलांडून गेले

खड्ड्याने त्या फेकलं मला दहाव्या नंबरावर
मला खरंच यायचं होतं दुसर्‍या नंबरावर || ६ ||

काय झालं आठवत नाही
झालो मी बेभान
ठेवण्याकरता तार्इच्या त्या
विश्वासाचा मान

संचारला मग माझ्या अंगी
हनुमंताचा जोर
डोळ्यासमोर दिसत होता
शेवटचा तो दोर

बघता बघता स्पर्धक पडले मागे भराभर
मला खरंच यायचं होतं दुसर्‍या नंबरावर || ७ ||

जेव्हा केव्हा ओलांडली मी
शेवटची ती रेष
तेव्हा कुठे कमी झाला
माझ्या मनचा त्वेष

भानावर मी आलो आणि
कळली मला खबर
सगळे हरले होतो माझा
पहिला हो नंबर

वीज जणू अन् कोसळली ती माझ्या डोक्यावर
मला खरंच यायचं होतं दुसर्‍या नंबरावर || ८ ||

निकाल ऐकून नाचत होते
सारे गावकरी
काय करून बसलो गोष्ट
माहित मलाच खरी

देता देता विजयाचा तो
करंडक आणि पैसे
समजत नव्हतं कोणा
ह्माला रडू येर्इ कैसे

घरी पैसे नव्हते खर्च होणार बुटावर
मला खरंच यायचं होतं दुसर्‍या नंबरावर || ९ ||

शेअर करा
87

आणखी असेच काही...

मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
नोव्हेंबर 25, 2022

छेड


पुढे वाचा...
जानेवारी 3, 2022

विद्ध


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023
  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो