logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
नशीबवान
ऑक्टोबर 21, 2016
श्रद्धा
जानेवारी 20, 2017
नियती
डिसेंबर 2, 2016
निवृत्तीनंतर मी गावी जाऊन राहणार आहे; माझ्या मुलीला मी डॉक्टर बनवणार आहे; येत्या तीन वर्षांत युरोप फिरून येण्याचा विचार करतोय; पुढल्या वर्षी तुझा वाढदिवस येईल तेव्हा जेवायला हॉटेलात जाऊ या; उद्या मी लवकर घरी येणार आहे . . . आपल्यापैकी प्रत्येकजण अमरत्वाचा पट्टा घेऊन आल्याप्रमाणे वागत असतो. आयुष्याचा बुद्धिबळाचा डाव आपण ‘नियती’ ह्या अपराजित खेळाडूबरोबर खेळत आहोत हेच विसरत असतो . . .

विमानतळावर घोषणेची पाहत बसलो होतो वाट
बरीच विमानं लेट होती गर्दी झाली होती दाट
बोलणं गदारोळात त्यांचं बसलो होतो ऐकत
आवाज आला मला कुणीतरी होतं छद्मी हसत || १ ||

समोरची ती वयस्क बार्इ सांगत होती नवर्‍याला
किती दिसांनी भेटेल आता आपला मुलगा आपल्याला
इतके दिवस तिकडे राहिला कसा असेल तो दिसत
आवाज आला मला कुणीतरी होतं छद्मी हसत || २ ||

वेटिंगरूमच्या फोनवरती लागला एकजण ओरडायला
पोहोचतोच आहे थोड्या वेळात पाहून घेतो तुम्हाला
पैसे तयार ठेवा नाहीतर नाही तुम्ही वाचत
आवाज आला मला कुणीतरी होतं छद्मी हसत || ३ ||

नवविवाहित जोडपं एक थोडं बसलं होतं दूर
कुजबुजला तो कानात तर ती बोलली लाजून चूर चूर
तिथे पोहोचेपर्यंत तुजला धीर नाही का निघत
आवाज आला मला कुणीतरी होतं छद्मी हसत || ४ ||

मागे बसले होते दोघे फोन एकाचा वाजला
मुलगी झाली ओरडला तो अक्षरश: नाचला
म्हणे चाललो मी तर घरी टूर गेली उडत
ह्मा वेळी मात्र कुणीही नव्हतं छद्मी हसत || ५ ||

थोड्याच वेळात अनाउंसमेंटचे शब्द कानावर आले
माझं फ्लाइट नव्हतं बाकी सारे तयारही झाले
वेळेत पोहोचू आता सारे आपसात होते बोलत
पुन्हा आवाज आला कुणीतरी होतं छद्मी हसत || ६ ||

बहुतेक सारे गेले वेटिंगरूम रिकामी मग झाली
माझं फ्लाइट लेट घोषणा माझ्या अन् कानी आली
हसत होतं कोण नक्की मला नव्हतं कळत
आता मात्र आजूबाजूस कोणीच नव्हतं हसत || ७ ||

बसलो होतो वाचत कल्लोळ झाला तेथे जबरदस्त
आताच जे गेलं ते विमान झालं होतं अपघातग्रस्त
समजून चुकलं मला माझं मन नव्हतं सावरत
ऐकून बोलणं त्यांचं त्यांना नियतीच होती हसत || ८ ||

हे करीन अन् ते करीन ही बाष्फळ बडबड नुसती
पुढचा विचार करायची आता बसली आहे धास्ती
भविष्यकाळातले मनोरे आपण असतो बांधत
नियती मात्र करमणुकीने असते तेव्हा हसत || ९ ||

काही अभिप्राय

  • अनिल शितकर
    ही कविता खूप छान आहे.
    अनिल शितकर
    ३१-०१-२०१८
शेअर करा
28

आणखी असेच काही...

जून 5, 2023

तुळस


पुढे वाचा...
मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
नोव्हेंबर 25, 2022

छेड


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • तुळस जून 5, 2023
  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो