बेडूकशाही
ऑगस्ट 19, 2011रफू
नोव्हेंबर 18, 2011अनाथ
आयुष्यात एखाद्या व्यक्तीच्या हातून घडलेल्या घोडचुकीचे परिणाम जर त्या व्यक्तीला भोगावे लागले तर आपण ‘करावे तसे भरावे’ असं म्हणून मोकळे होतो. पण त्याच चुकीचे परिणाम जर इतरांना भोगावे लागले तर त्याला काय म्हणावं …?
जन्मापासून अकरा वर्षे होते माझे घर
आर्इ देखील बाबा देखील होते माझे सर
एक व्यक्ती येऊन म्हणते ये तू माझ्यासंगे
भरेल आमुचे सुने सुने घर मिळेल तुज छप्पर
अनाथाश्रमा सोडूनी जाता आले मजला रडू
तर ती व्यक्ती म्हणे सरांना समजूत आम्ही काढू
वळून पाहिले मागे पुसती सर आपुले दो डोळे
डौलदार गाडीत दु:खी मी जेव्हा लागे चढू
दिला होता शब्द सरांना राग ठेवला मनात
दुनिया काही म्हणो मला पण आहे मी अनाथ || १ ||
घरी जाऊनी मला म्हणाला बाळा ही बघ आर्इ
मला पाहूनी मान फिरवली शब्दही वदली नाही
चेहरा तिचा पाहूनी मनी ह्मा प्रकाश पडला लख्ख
केवळ योगायोगे त्याने मला निवडले नाही
जन्माला घातले मला पण आठवण आली आज
मला बनविले अनाथ तेव्हा कसला होता माज
आज स्वत:ला मुल नसे तर उरावरी पत्नीच्या
मला बसवितानाही त्याला वाटत नव्हती लाज
सोडून दिधले मला जगाच्या अमानवी रानात
दुनिया काही म्हणो मला पण आहे मी अनाथ || २ ||
मनात ठरले ह्माला आता शिकवीन मी तर धडा
आधीच ह्माच्या पापांचा भरला तो पुरता घडा
खेळ केवढे कपडेलत्ते ऐट माझी हो फार
बाप म्हणविणारा तो माणूस धनाढ्य होता बडा
पछाडतो तो जंग जंग जिंकण्यास माझे मन
पणास लावून सारे काही तन मन आणि धन
मजला समजत होती त्याच्या घालमेल हृदयाची
पण खंबीर मन ठेवायाचा मी केला होता पण
झिडकारूनी टाकीन प्रेम कुणी दिले जर दानात
दुनिया काही म्हणो मला पण आहे मी अनाथ || ३ ||
विदीर्ण त्याचे हृदय बघूनही वरकरणी मी शांत
वाट पाहतो कधी तयाचा संयम होतो अंत
तीळ तीळ तुटला तो तरीही बधलो नाही मी
माउलीस त्या त्रास जाहला राही एकच खंत
क्लेश मनाचे पचवत राही माउली अशी थोर
तिचा म्हणून मी आलो होतो कोण कुणाचा पोर
पती मानला ज्याला तो करी प्रतारणा ही ऐशी
पदोपदी अन् दिसे पुरावा तिला चक्षूंसमोर
चेहरा कोरा ठेवून तरी ती वावरली जनात
दुनिया काही म्हणो मला पण आहे मी अनाथ || ४ ||
शेवटपर्यंत विझली नाही तिरस्कारमय धग
अपराध्याच्या ग्रस्त मनाने धरला नाही तग
माझ्या तोंडून ‘बाबा’ इतुका शब्द ऐकण्यासाठी
झुरत झुरत राहिला आणखी सोडून गेला जग
हरला पुरता समोर माझ्या जाणीव होती मला
अपराधाची ह्मा जन्मातच सजा मिळाली त्याला
शोकाकुल अवकळा पसरली चेहेऱ्यावरती तिच्या
सुटलीस तुही मीही सुटलो बोल बोललो तिला
दु:खाने व्याकुळला चेहरा नव्हती ती भानात
दुनिया काही म्हणो मला पण आहे मी अनाथ || ५ ||
मान खाली घालून म्हणाली केलीस मोठी चूक
तुला जिंकणं एकच त्याच्या मनात होती भूक
कधीही समजले नाही तुजला होता किती तो थोर
आपुली म्हणुनी जगला तो जी होती माझी चूक
सत्य कसे तुजला सांगावे नव्हते मजला समजत
बनविन आपला मुलगा जगला ईर्षा मनात जपत
लाव्ह्माचा रस तप्त शब्द ते शिरले मम कानात
आता कितीही रडलो तरीही येर्इल का तो परत
सख्खी आर्इ आहे पण मी बापाविना अनाथ
दुनिया काही म्हणो मला पण आहे मी अनाथ || ६ ||