मार्च 3, 2013
'मी असा आहे', 'मी तशी आहे' ... अशा वल्गना करताना आपण सोयीस्करपणे विसरतो की आपण जसे आणि जिथे आहोत ते असणं आपल्या हातात कधीच नव्हतं, नसतं. त्याला उत्क्रांती म्हणा, प्राक्तन म्हणा किंवा देवाची करणी म्हणा, शेवटी आपलं असणं हा फक्त एक योगायोग आहे. काल संपन्न झालेल्या 'राष्ट्रीय विज्ञान दिना'निमित्त ही एक विज्ञानावर आधारित कविता ... एकच केवळ अंडाशय ते इतुक्या मोठ्या पोटी एक जिंकला शुक्राणू अन् हरले कोटी कोटी विजयाची तुमच्या सांगावी काय शक्यता होती शक्यताशक्यतांचा ऐसा पिढ्यान् पिढ्यांचा ओघ आहे तुमचं माझं जगणं म्हणजे निव्वळ योगायोग आहे





