डिसेंबर 1, 2021
देवाने माणसाला स्वसंरक्षणाकरता अणकुचीदार दात, धारदार नखं, तीक्ष्ण नजर, पळण्याचा वेग, उडण्याची क्षमता, विषारी दंश, केसाळ त्वचा ह्यापैकी काहीही दिलं नाही. दिली ती फक्त विकसित होत जाणारी बुद्धी आणि मग देव म्हणाला, जा माझ्या प्रिय बालका, जा आणि पृथ्वीवर राज्य कर. मात्र गेल्या काही सहस्रकांमध्ये माणसाने पृथ्वीवर जो हैदोस घातला आहे, त्यामुळे बहुधा देवही हताश झाला असेल .. देव बसला वर आम्ही खाली जमिनीठायी आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥ गरीब राहतो गरीब कारण पैसा ओढतो पैसा अफरातफर गुन्हे करा नाहीतर तसेच बैसा भाकर-तुकडा मिळत नसेल तर भोजन करा शाही आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/qVGQeuSvdwU ह्या ठिकाणी ऐकता येईल.









