डिसेंबर 21, 2012
गाणी ऐकणं, फोनवर बोलणं, झोप काढणं, नाश्ता करणं ... थोडक्यात सांगायचं तर मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये दर दिवशी काही तास घालवणं हे आपल्यातील अनेकांच्या आता अंगवळणी पडलं आहे. मात्र बाहेरगावची एखादी हौशी व्यक्ती जेव्हा गाडी घेऊन मुंबईत येते तेव्हा काय हाल होत असतील ह्याची कल्पनाच न केलेली बरी ... नवी कोरी गाडी घ्यायची केलीत एवढी घाई आता मुंबई तरी दाखवून आणा म्हणाली मुलं आणि त्यांची आई गाडी परवडली एवढं त्या प्रवासाचं झालं मोल कारण दर दहा पावलांना आम्ही भरत गेलो टोल वेशीवर पोहोचेपर्यंत आमचं गाडी नावाचं घोडं जसं अगदी दमलं मुंबईच्या ट्रॅफिकशी आमचं कधीच नाही जमलं









