डिसेंबर 16, 2021
चैत्र शुद्ध प्रतिपदा (वसंत ऋतू) नूतनवर्षाभिनंदन आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हिंदू बहुसंख्य भारतवर्षातील हिंदूंचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/EqipUBxIFvI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
चैत्र शुद्ध प्रतिपदा (वसंत ऋतू) नूतनवर्षाभिनंदन आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हिंदू बहुसंख्य भारतवर्षातील हिंदूंचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/EqipUBxIFvI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
देवाने माणसाला स्वसंरक्षणाकरता अणकुचीदार दात, धारदार नखं, तीक्ष्ण नजर, पळण्याचा वेग, उडण्याची क्षमता, विषारी दंश, केसाळ त्वचा ह्यापैकी काहीही दिलं नाही. दिली ती फक्त विकसित होत जाणारी बुद्धी आणि मग देव म्हणाला, जा माझ्या प्रिय बालका, जा आणि पृथ्वीवर राज्य कर. मात्र गेल्या काही सहस्रकांमध्ये माणसाने पृथ्वीवर जो हैदोस घातला आहे, त्यामुळे बहुधा देवही हताश झाला असेल .. देव बसला वर आम्ही खाली जमिनीठायी आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥ गरीब राहतो गरीब कारण पैसा ओढतो पैसा अफरातफर गुन्हे करा नाहीतर तसेच बैसा भाकर-तुकडा मिळत नसेल तर भोजन करा शाही आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/qVGQeuSvdwU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नूतनवर्षाभिनंदन! सण साजरे करणं हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य घटक असतो. एखाद्या गावाची, शहराची, राज्याची किंवा देशाची संस्कृती तेथील समाज म्हणजेच लोक ठरवत असतात. त्यामुळे एखादा सण साजरा करण्याकरता जात, धर्म, वय, लिंग, आर्थिक परिस्थिती असे भेद आड येत नाहीत. त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सण त्या समाजाचा सण बनतो. आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/EqipUBxIFvI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
आज चाचा नेहरूंचा वाढदिवस. छोट्या आणि पोक्तपणाचा आव आणणाऱ्या मोठ्यांच्या मनात दडलेल्या अश्या दोन्ही बच्चाकंपनींना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आजच्या दिवसाकरता हे खास बालकाव्य. तुम्हीही ऐका आणि छोट्यांनाही ऐकवा ...
बेडकांची शाळा
तिथे कावळा आला काळा
म्हणतो शिकवीन तुम्हाला
तो एकच माझा चाळा
बेडूक म्हणती वाहव्वा खास
घे भूगोलाचा तू तास
कावळा म्हणाला चालेल
शिकवू लागला इतिहास
गणिताची आली वेळ
कावळ्याचे न्यारे खेळ
बेरिज वजाबाकीची
तो करतो सारी भेळ
ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/LA3sNV73wMI ह्या ठिकाणी ऐकता येईल.‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे ...’ आपल्यापैकी प्रत्येकाने शाळेत असताना ही प्रतिज्ञा म्हटलेली आहे. धर्म, जात, प्रांत, भाषा असल्या भेदभावांच्या पलीकडे जाऊन एक देश म्हणून एकत्र येण्याचा संदेश ही प्रतिज्ञा देते. आज पंचाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रत्येक भारतीयाने ही प्रतिज्ञा पुन्हा एकदा करण्याची वेळ आली आहे. केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर त्यामागील अर्थ समजून घेऊन ... इतिहासाने घालून दिलेली पृथ्वीवरील वेस आहे श्वासाइतकं सत्य आहे भारत माझा देश आहे ॥ लहानपणी आपण प्रत्येकाने ही प्रतिज्ञा म्हटली होती आता मात्र शब्दांबरोबर त्यातील भावनाही नामशेष आहे ॥ माझे धर्म भाषा प्रांत त्याचे धर्म भाषा प्रांत माझ्या देशातील बांधवांमध्येही आता सख्खे सावत्र अशी रेष आहे ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/VAVE5ntF3FM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
गेल्या काही महिन्यांत मध्यमवर्गीय पुरुषांना घरातील स्त्रीचं महत्त्व काही प्रमाणात समजू लागलं आहे. अनेक पुरुष घरातील स्त्रीला चक्क घरकामात मदत करू लागले आहेत. त्याबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घेताना ते अजिबात दमत नाहीत. मात्र संसारात बुडून गेलेल्या ह्या स्त्रीच्या आयुष्यातील काही अगदी साध्या साध्या अपेक्षा समजून घेऊन पूर्ण करण्यात आपण पुरुष खरच यशस्वी झालो आहोत का?! त्याच्या कमाईतच त्यांचं सुख होतं तिला सतत होती जाण मग ती आपल्या दोन मुलांच्या विश्वातच झाली रममाण त्याला मिळाला कुटुंबप्रमुख, अनभिषिक्त राजाचा मान तिने स्वीकारलं कुटुंबातील तिचं दुय्यम स्थान कुटुंबाला एकत्र बांधणारा दुवा म्हणून आपण राहावं तिची एकच अपेक्षा होती, रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र करावं ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/YAvi8iAzEjM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
आपल्या मनात एक शांत डोह असतो. रोजच्या धावपळीत आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीवही नसते. मात्र कधीतरी... एखाद्या कातर संध्याकाळी... जेव्हा आपल्याला मोकळा वेळ असतो तेव्हा आपण त्या डोहाच्या किनाऱ्यावर जाऊन उभे राहतो. कसे कुणास ठाऊक अचानक त्या डोहात तरंग उठू लागतात. किनाऱ्यावर उभं असलेल्या आपल्यापर्यंत त्या लाटा पोहोचतात. आठवणींच्या लाटा! सुरुवातीला अगदी हळूवार... आणि मग... शांत एका संध्याकाळी आठवणींची लाट उठली आणि मनाच्या किनाऱ्यावर अलगद येऊन फुटली || वाऱ्याची एक झुळूक आली अंगावर आला काटा डोळ्यांसमोर दिसू लागल्या मागे पडलेल्या वाटा || नक्की समजत नव्हतं पण वाटू लागलं उदास जणू कसलीशी पूर्वसूचना मिळत होती मनास || बघता बघता काळे ढग मन भरून आलं दाट मग आठवणींची धडकू लागली लाटेमागून लाट || ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ekAFpxpSmHE ह्या ठिकाणी ऐकता येईल.
कोरोनाच्या संकटामुळे सारं जग हवालदिल झालं आहे. ह्या संकटात काही जणांनी आपले प्रियजन गमावले आहेत. इतरांना आपल्यावर तर अशी वेळ येणार नाही ना अशी धास्ती वाटते आहे. आपण ह्या संकटाला फार लवकर शरण जात आहोत असं तर नाही ना? हे संकट नैसर्गिक आहे – बहुतेक. पण मग निसर्गाकडूनच आपल्याला काही शिकता येईल का? ह्या काव्यकथेतील स्वामींनी आपल्या शिष्याला दिलेली शिकवण, पाहा तुम्हालाही पटतेय का ते ... एक दिशी तो शिष्य पाहतो आक्रीत काही घडले शिष्याचे ते रोप त्या तिथे मोडून होते पडले ॥ आकांडतांडव करुनी शिष्य आश्रम घेई डोक्यावर स्वामी मात्र टाळती काहीही बोलायाचे त्यावर ॥ गळली पाने रोपाची पण शिष्य करी दुर्लक्ष स्वामी मात्र जल घालती त्याला रोज राहुनी दक्ष ॥ एक दिशी शिष्यास स्वामींनी रोपापाशी नेले काडीवरती शुष्क एक ते पान दिसे इवलाले ॥ ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/ZAgyTFrPPhY ह्या ठिकाणी ऐकता येईल.
आज आंतरराष्ट्रीय कविता दिन आहे. बरेचदा असं होतं की मित्र-मैत्रिणींचा एक छान समूह असतो. सगळं अगदी मजेत चाललेलं असतं आणि अचानक एक दिवस त्या समूहावर संकटाचा डोंगर कोसळतो. त्या समूहातील एका व्यक्तीला कविता होते. म्हणजे अगदी एखाद्याला सर्दी होते किंवा कावीळ होते ना, तशी कविता होते. दुर्दैवाने त्या असाध्य रोगाच्या परिणामांची जराही कल्पना त्या रोगी व्यक्तीला नसते. भोगतात ते बिचारे त्या समूहातील इतर जण ... कवीराज ते आले आले झाली पळापळ आप्तमित्र अन् सवंगड्यांच्या छातीत आली कळ ॥ काही लपले खुर्चीखाली टेबलखाली काही बाथरूममध्ये गेला जो तो बाहेर आला नाही कवीराज ते आले आले झाली पळापळ खिडकीतूनच सूर मारती होते जे चपळ ॥ उरले होते त्यांना वाटे रडू या काढून गळे तरीही कवीला पाहून हसती सारेच बळेबळे कवीराज ते आले आले झाली पळापळ केविलवाणे भाव जैसी शिक्षा आता अटळ ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/Pp-ZLpZqC9k ह्या ठिकाणी ऐकता येईल.