फेब्रुवारी 15, 2013
दर वर्षी येणारा फेब्रुवारी २१ हा दिवस राष्ट्रकुल संघाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला आहे. हा दिवस जरी पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानातील (सध्याच्या बांग्लादेशातील) बंगाली भाषिकांच्या लढ्याशी संबंधित असला तरी भारतासारख्या देशात जिथे इंग्रजी नावाच्या परक्या मावशीने आपल्या मराठी मातेची गळचेपी चालवली आहे, तिथे विशेष महत्वाचा आहे. आपल्या घरात ठाण मांडून बसलेल्या ह्या परक्या मावशीला मारलेली ही एक कोपरखळी ... माध्यम घेतलं इंग्रजी तर कच्चा राही पाया शिक्षण घेतलं मराठीमध्ये सारंच जाई वाया साधे साधे शब्द मराठी कळत आता नाहीत daddy झाले बाबा आणि mummy झाल्या आया आपली भाषा विसरून जाती पडले सारे फशी आपल्या घरात ठाण मांडुनी बसली परकी मावशी









