एप्रिल 4, 2014
एप्रिलचा महिना म्हणजे मला अजूनही परीक्षांची आठवण होते. ते पॅड, कंपॉस आणि खास परीक्षेची पेनं, पेन्सिली घेऊन परीक्षेला जाणं. त्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका. ते कधी सारं काही येतंय तर कधी काहीच येत नाही असं वाटणं. ह्या गोष्टीतील मुलीचीही अशीच काहीशी गत झालेली आहे . . . ". . . मी पेपरवर नजर फिरवणार एवढ्यात मला बाईंचे शब्द ऐकू आले की आजचा पेपर म्हणींवर आधारित आहे. म्हणजे भरवशाच्या म्हशीला टोणगा. तुम्हाला खरं सांगते की त्यानंतर नक्की काय घडलं ते मला नीटसं आठवतच नाही. पेपर वाचला आणि मला पळता भुई थोडी झाली. अहो पुस्तकातील शेवटचा चॅप्टर म्हणींचा होता जो काल मी पहिल्यांदा उघडून पाहिला होता. आता तहान लागल्यावर विहीर खणली तर ती तहान भागणार तरी कशी . . . "









