फेब्रुवारी 3, 2025
लहानपणीची बाटलीतल्या राक्षसाची गोष्ट आठवतेय ना? परीकथेतला राक्षस परीकथेतच राहायचा ते बरं होतं. पण आता एक बाटलीतला नवीनच राक्षस मानवाने बाहेर काढला आहे. त्याच्या कामाचा आवाका परीकथेतल्या राक्षसासारखाच आहे ज्याचा आता आपल्याला त्रास व्हायला लागला आहे. परीकथेतला राक्षस माणसाच्या चातुर्याने परत बाटलीत गेला. हा राक्षस मात्र माणसापेक्षा जास्त चतुर आहे.. त्याची ही गोष्ट. एका मोठ्या कंपनीची ही बातमी आहे आतली त्या कंपनीच्या एका एम्प्लॉयाला सापडली एक चमत्कारी बाटली ॥ आतून एक राक्षस निघाला उघडताच झाकण म्हणाला कैक युगं करत होतो मी ह्या बाटलीची राखण ॥ काम करण्याचा माझा अचाट आहे आवाका कोणतंही आणि कितीही काम सांगा फक्त एक नियम याद राखा ॥ मी थकत नाही ना कंटाळत ना झोप मला ना भूक कामाशिवाय मला ठेवण्याची मात्र तू कधीही करू नकोस चूक ॥