logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
Pustake
जानेवारी 28, 2018
cover

कथासंग्रह

'मानवी मनाची खोली अजून विज्ञानालाही मोजता आलेली नाही. समाजात वावरताना कसं वागावं एवढंच नव्हे तर कसा विचार करावा ह्याचंही साचेबद्ध प्रशिक्षण आपल्याला लहानपणापासून मिळालेलं असतं. आपल्या मनाला मात्र ही बंधनं मान्य नसतात. सामाजिकच काय पण भौतिकशास्त्राचे नियमही मन मानत नाही. कधी कधी स्वप्नांमध्ये दिसणारे अशक्य कोटीतील खेळ मन उघड्या डोळ्यांसमोर मांडू लागतं. आणि मग 'अतर्क्य' वाटणाऱ्या घटनाही तर्कसंगत भासू लागतात ... '

‘अतर्क्य’ विकत घेण्याकरता तुम्ही पुढील संकेतस्थळांना भेट देऊ शकता ...

AmazonBookGanga

BookGanga

काही वाचकांचे अभिप्राय
  • Naresh Pasalkar
    Rich in mystery, varied subjects...and pivoting descriptions.... "MaanasKanya" is atarkya but closer to science fiction.
    Naresh Pasalkar
    30 Nov 2015 04:27 AM
  • VSKanekar
    Great !!! Ratnakar Matkari chya lekhanajaval janaare lekhan !!!
    VSKanekar
    24 Sep 2015 02:45 PM
  • Sandesh Palande
    Curious stories, Book hatatun khali thevavese vatat nahi.
    Sandesh Palande
    13 Aug 2015 11:37 AM
  • Rohit
    Amazing Mysterious stories that makes you stun. अतिशय सुंदर भाषाशैली.
    Rohit
    11 Aug 2015 04:30 AM
  • गौरी भोसले
    पुस्तक अतिशय वाचनीय आहे. त्यातील कथा वास्तवाशी तार्किक संबंध लावणाऱ्या आहेत.
    गौरी भोसले
    ग्रंथपाल, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, रत्नागिरी
  • मंजुषा कुलकर्णी
    आधुनिक युगात प्रत्येक गोष्ट विज्ञानावर आधारित असल्याशिवाय तिचा खरेपणा सिद्ध होत नाही. तरीही जगात अशा घटना घडत असतात की त्या विज्ञानाच्याही पलीकडे असतात. अशा अद्भुत, रहस्यमय, अघटित गोष्टींच्या कुतूहलातून लिहिलेल्या कथा ‘अतर्क्य’मध्ये वाचावयास मिळतात. अतिथरारकता टाळून लिहिलेल्या आकलन शक्तीपलीकडील ह्या कथा वाचकांना खिळवून ठेवतात.
    मंजुषा कुलकर्णी
    BookGanga
  • राजाध्यक्ष मॅडम
    'अतर्क्य' हे संदीप दांडेकर ह्यांचे पुस्तक वाचनीय आहे. वाचत असताना स्थळकाळाच्या पलीकडे आपण जाऊन पोहोचतो. ‘ओघवती भाषा’ हे या पुस्तकातील सर्वच कथांचे वैशिष्ट्य. या कथा वाचत असताना मनाची विविध आंदोलने अनुभवता येतात. ‘अरे, असंही होऊ शकतं’ याचा अनुभव येतो. या कथांमधून मानवी मनाचे विविध कंगोरे उलगडताना दिसतात. प्रत्येक कथेत वाचकही भावनिकदृष्ट्या गुंतत जातो. वाचकाला खिळवून ठेवणे हे ह्या कथांचे आणखी एक वैशिष्ट्य.
    राजाध्यक्ष मॅडम
  • वैशाली जाधव
    अशा काही गोष्टी ज्या बरेचदा आपल्या बुद्धीच्या, आपल्या तर्काच्या पलीकडल्या आहेत. मला खरं तर रहस्यमय कथा फारशा आवडत नाहीत पण हे पाहिलं पुस्तक आहे की वाचायला घेतल्यावर बाजूला ठेवण्याची इच्छा होत नव्हती. पुस्तकाचा हेतू जरी मनोरंजन असला तरी एका पॉइंटला जाऊन ते आपल्याला विचार करायला भाग पाडतं. अशा पद्धतीचं लिखाण इंग्रजीमध्ये आहे पण मराठीमध्ये असं लिखाण फार क्वचित दिसून येतं. आपल्या बुकशेल्फवर हे एक वेगळ्या धाटणीचं पुस्तकं ठेवायला काहीच हरकत नसावी.
    वैशाली जाधव
    आकाशवाणी, पुणे केंद्र
  • संजीव कुंटे
    'अतर्क्य' पुस्तकं वाचले. मनापासून आवडले... मराठीच्या मानाने मी इंग्रजीमध्ये जास्त वाचले आहे... 'अतर्क्य'चा format आणि theme मला संपूर्णपणे माझ्या आवडीमध्ये बसणारी वाटली. आणि ती खरंच तशी निघाली... सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे अर्थातच 'दुःख'! अप्रतिम central idea आणि उत्कृष्ट expansion... प्रत्येक गोष्टीने करमणूक नक्की दिली... On the point of research मानसकन्या deserves a special mention... अशीच चांगली पुस्तके लिहिण्यासाठी शुभेच्छा!
    संजीव कुंटे
    २६-०३-२०१८
  • मनीषा चांदुरकर
    पुस्तक खूप आवडलं. 'मानसकन्या' सर्वात जास्त...
    मनीषा चांदुरकर
    १४-०२-२०१८
शेअर करा
0
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो