मार्च 18, 2018
'आजची आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना ह्यापूर्वी कधीतरी घडलेली असते. आयुष्य हे रुळावरून धावणाऱ्या आगगाडीप्रमाणे असतं असं गृहीत धरून आपण जगत असतो. आयुष्याला कलाटणी देणारे बदल केवळ इतरांच्या बाबतीत घडतात असा आपला ठाम समज असतो. इतरांकरता आपण ‘इतर’ असतो हे आपण सोयीस्करपणे विसरतो. त्यामुळे एखादी अघटित घटना जेव्हा आपल्या आयुष्यात घडते तेव्हा आपण मुळापासून हादरून जातो. आपल्या बाबतीतही असं घडू शकतं ह्या साक्षात्कारामुळे आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पार बदलून जातो...’ ‘अघटित’ प्रकार: लघुकथासंग्रह स्वरूप: छापील, Kindle Edition प्रकाशक: राफ्टर पब्लिकेशन्स पृष्ठसंख्या: २२८ कमाल किंमत: ₹ २५०/- (छापील), ₹ २००/- (Kindle Edition)