एप्रिल 7, 2025
जागतिक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा! शारीरिक आरोग्याइतकंच, किंबहुना थोडं जास्तच महत्त्वाचं मानसिक आरोग्य असतं. स्वतःच्या आणि इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत असताना जेव्हा संकटं घेरतात तेव्हा मनाला उभारी देण्याकरता कुणीतरी पाठीवर हात ठेवून लढ म्हणणंही पुरेसं असतं.. बागेमध्ये बसला होता चुरगळलेला वेश चेहरा होता उदास होते अस्ताव्यस्त केस तरूण होता मनात त्याच्या विचार होते घोळत स्वत:शीच बोलत होता हात होता चोळत वृद्ध पाहात बसला होता जवळच बाकावर जाऊन त्यास म्हणाला तरूणा स्वत:ला सावर शून्यात नजर लावून तरूण म्हणे सावरू कसा नोकरी गेली माझी त्याचा दाटून आला घसा खिशामधून चुरगळलेला कागद काढला एक आज मिळाला फुल अॅण्ड फायनल सेटलमेंटचा चेक ॥