साठा उत्तराची कहाणी
एप्रिल 4, 2014विहीर
फेब्रुवारी 19, 2016
प्रत्येक खुनाला कधी ना कधी वाचा फुटते असं म्हणतात. खरंच?!
. . . एका आयुष्याच्या समाप्तीची निश्चिती त्या मडकं फुटण्याच्या आवाजात ध्वनित झाली. मडक्यातील उरलेलं पाणी आणि मडक्याचे तुकडे इतस्ततः पसरले.
“थोडा संयम पाळला असता तर आज ही वेळ आली नसती.” अरे बाप रे! शेजारच्या गृहस्थांचं स्वगत पुन्हा सुरु झालं होतं. मी मघाशीच जागा बदलायला हवी होती. पण आता थोडाच वेळ उरला होता. मी शांतपणे हाताची घडी घालून नजर त्या धगधगणाऱ्या चितेवर ठेवली.
“आपल्या सावजाला बेसावध कसं ठेवायचं ते ह्या मुलीकडून शिकावं. आत्महत्या म्हणे! हा धडधडीत खून आहे खून. मी सांगतो कसा ते.” बोलणं पुटपुटल्याप्रमाणे असलं तरी मला स्पष्ट ऐकू येत होतं . . .