वास्तुपुरूष
सप्टेंबर 16, 2011बॅकस्टेज
आजुबाजूला अंधार होता. अंधारात काही माणसंही उभी होती बहुतेक. एक दरवाजा दिसला तो उघडून मी आत शिरलो. आत चांगला लख्ख उजेड होता. बरीच माणसं एकमेकांशी गप्पा मारत बसली होती. एकंदरीत वातावरण आनंदी होतं. समोरून येणारा एक तरूण माझ्याकडे पाहून हसला. माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, ‘छान झालं तुझं काम’. माझ्या चटकन् लक्षात आलं नाही. त्याला काही विचारणार तोवर तो निघूनही गेला होता. विचार करत होतो तेवढ्यात समोरून जाणारी एक देखणी युवती जाता जाता म्हणाली, ‘ए, काय मस्त काम केलंस रे. एकदम् झक्कास!’ तिलाही खुलासा विचारायला मला वेळच मळाला नाही. दोघांचेही चेहरे मला ओळखीचे वाटत होते पण ओळख नक्की ठरवता येत नव्हती. तसं म्हणायला त्या खोलीतले बरेच चेहरे मला ओळखीचे वाटत होते पण कोण ते काही केल्या आठवत नव्हतं. हल्ली तसाही मला चेहरे आणि नावांची सांगड घालायला फारच त्रास होत होता. सत्तरीचा परिणाम असणार दुसरं काय. ओळखीच्या चेहर्यांची नावं आठवत नाहीत आणि त्यामुळे उगीचच अनोळखी माणसंसुद्धा ओळखीची आहेत की काय असा संशय येत रहातो. असो.
‘अतर्क्य’ विकत घेण्याकरता तुम्ही पुढील संकेतस्थळांना भेट देऊ शकता ...
ही लघुकथा माझ्या ‘अतर्क्य’ ह्या छापील स्वरुपात प्रकाशित झालेल्या कथासंग्रहात समाविष्ट झाल्यामूळे येथे उपलब्ध नाही.