मे 23, 2022
हल्लीच्या तापलेल्या (किंवा तापवलेल्या) राजकीय वातावरणात देवाला बरे दिवस आले आहेत. तसा सर्वसामान्य माणसाचा देवावर विश्वास असतोच. संकटसमयी बहुतेकांना देवाचाच आधार वाटतो. मात्र देव म्हणजे नक्की काय ह्याचं उत्तर प्रत्येक व्यक्ती खचितच वेगळं देईल. लहान मूल गर्दीमध्ये वाट चुकलं होतं अनोळखी चेहरे पाहून पार बुजलं होतं गळ्यात आयकार्ड गेली एका इसमाची नजर चिमुकला हात धरून गाठून दिलं घर छोटुल्याला बघुन आई रडली धाय धाय देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥ लोकलमधून लटकत होतो बॅगेकडे लक्ष खांबामुळे होणार होता माझा कपाळमोक्ष माझ्या दिशेने गर्दीमधून हात आले चार एवढ्या गर्दीत आत घेतलं जसा चमत्कार खरं तर आत जागा नव्हती ठेवायलाही पाय देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/NJU_PDnFHcE ह्या ठिकाणी ऐकता येईल.