डिसेंबर 4, 2024
शहरांच्या पसरण्याला एक सीमा असते. ही सीमा गाठली की मग शहरं उंचीने वाढू लागतात. दहा, तीस, सत्तर मजली इमारती. आणि मग अश्या इमारतीतील घराच्या खिडकीतून दिसतात त्या फक्त इतर खिडक्या. भावनाविरहीत, व्यक्तीनिरपेक्ष, भौमितीय खिडक्या.. नवी भव्य ती इमारत कित्येक लोक वसले आयुष्य मात्र त्यांचे खिडकीत नाही दिसले ॥ आयुष्यभर शिदोरी जमवून घर मिळाले ते कष्ट दो जीवांचे खिडकीत नाही दिसले ॥ परदेशी पुत्र आपुल्या मातापित्यास विसरी कारुण्य जोडप्याचे खिडकीत नाही दिसले ॥